जि.प.प्रा शाळा, चपळगाववाडी व ग्रामपंचायत चपळगाववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मेरी मिट्टी मेरा देश, मिट्टी को नमन, विरोंको वंदन अभियान संपन्न
अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य सोहळा

जि.प.प्रा शाळा, चपळगाववाडी व ग्रामपंचायत चपळगाववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मेरी मिट्टी मेरा देश, मिट्टी को नमन, विरोंको वंदन अभियान संपन्न


अंतर्गत सकाळी ७:३० वाजता जि प प्रा शाळेत शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री करीम नदाफ यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व अध्यक्ष श्री गौरीशंकर दोड्डाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गायनानंतर ‘ हर घर तिरंगा,घर घर तिरंगा ‘ उपक्रमांतर्गत सर्व मान्यवरांसमवेत गावातून प्रभात फेरी काढण्यात आली.त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच श्रीमती लक्ष्मीबाई अंकलगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यानंतर जि प शाळेत उभारलेल्या शिलास्तंभाचे पूजन गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री राजेंद्र बेळ्ळे यांच्या हस्ते झाले



त्यानंतर शिलास्तंभाचे उद्घाटन व अनावरण सरपंच श्रीमती लक्ष्मीबाई अंकलगे यांच्या हस्ते झाले.यावेळी ग्रामसेविका श्रीमती बबिता गायकवाड मॅडम यांनी विद्यार्थी व पालकांना पंचप्रण प्रतिज्ञेची शपथ दिली.वसुधा नमन अंतर्गत ग्रामपंचायत सदस्या श्रीमती ललिता बन्ने, मुख्याध्यापक श्री शिवशरण गोविंदे,श्री.तुकाराम जाधव सर,श्रीमती स्वाती कडलासकर मॅडम, अंगणवाडी सेविका मंगलकाकू गोविंदे , आशा वर्कर श्रीमती तेजश्री गोविंदे,श्री.सिध्दाराम अंकलगे,श्री.रेवणसिध्द इटगळे,विश्वनाथ दसाडे , रेवणसिध्द बेळ्ळेकर, सोमनाथ स्वामी इ.मान्यवरांच्या व विद्यार्थ्यांच्या हस्ते शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
श्री.तुकाराम जाधव सरांनी उद्याच्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे नियोजन सांगितले.खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.