श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अंतर व बाह्य परिसर स्वच्छ, सुंदर, प्रसन्न व वसुंधराची जपणूक करणारे जिल्ह्यातील पहिले धार्मिक न्यास असल्याचे केंद्रीय गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी विक्रमसिंह

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भक्तानकरिता आवशक्यता उपाययोजना बरोबरच सुरक्षतेच्या दृष्टीकोनातून अग्निशामक वाहन, यंत्र सामग्री, अग्निरोधक यंत्र, सी.सी.टीव्ही.कॅमेरे, वाहन पार्किंग व पुरेशी मोकळी जागा असून सर्व बाजूने दक्षता घेण्यात आलेले असून, न्यासाचा अंतर व बाह्य परिसर स्वच्छ, सुंदर, प्रसन्न व वसुंधराची जपणूक करणारे जिल्ह्यातील पहिले धार्मिक न्यास असल्याचे मनोगत केंद्रीय गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी विक्रमसिंह यांनी केले.*

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वंस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना विक्रमसिंह म्हणाले कि, अन्नछत्र मंडळात सुरु असलेल्या महाप्रसादाची सेवा व दूरदृष्टीचे नेतृत्व असल्यानेच एका छताखाली स्वामी भक्तांना सोयी सुविधा देणारे जिल्ह्यातील एकमेव न्यास आहे. भक्तांना महाप्रसादा बरोबरच मंडळाच्या परिसरात शिवस्मारक, शिवसृष्टी, सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व मोठी पार्किंग व्यवस्था हे लक्षवेधी असल्याचे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी न्यासाच्या परिसरातील सुरक्षतेच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजनांची पाहणी व माहिती घेतले.

त्यांच्या समवेत अक्कलकोट उप विभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक मुजावर आय.वाय, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, गोपनीय विभागाचे धनराज शिंदे, शिव बिराजदार हे उपस्थित होते.
यावेळी मंडळाचे सचिव शामराव मोरे, मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, नामा भोसले, सतीश महिंद्रकर, दत्ता माने, वैभव मोरे, अतिश पवार, शुभम, कामनुरकर, सौरभ मोरे, विशाल कलबुर्गी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, देवराज हंजगे, गणेश लांडगे, शुभम भिंगे, मुन्ना कोल्हे, प्रतिक पोळ यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.