स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

सोलापूर विद्यापीठात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी स्वामी कृपा लाभावी.

सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीष कामत यांचे स्वामी समर्थांच्या चरणी साकडे

सोलापूर विद्यापीठात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी स्वामी कृपा लाभावी.

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. रजनीष कामत यांचे स्वामी समर्थांच्या चरणी साकडे

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१८.८.२०२३)
(श्रीशैल गवंडी) – सोलापूर विद्यापीठात नवनवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविण्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणार आहे. या कामी आपल्याला स्वामी कृपा लाभावी याकरिता आज स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन त्यांच्या चरणी साकडे घातले असल्याचे मनोगत मुंबई येथील होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू व सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ.रजनीष कामत यांनी व्यक्त केले. ते नुकतेच सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरूपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी कुलगुरू डॉ. कामत व गोवा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. गोरीष नाईक यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. याप्रसंगी डॉ.कामत बोलत होते.याप्रसंगी डॉ.कामत यांना शुभेच्छा प्रती मगोगत व्यक्त करताना महेश इंगळे यांनी
सोलापूर विद्यापीठाच्या मा.कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांचा कार्यकाल
पूर्ण झाल्यानंतर नवीन कुलगुरूंची निवड होईपर्यंत या पदाचा कार्यभार डॉ.कामत यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. डॉ. कामत यांनी यापूर्वी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातील विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता, विविध अधिकार मंडळाचे सदस्य, इलेक्ट्रॉनिक्स्, संगणक शास्त्र विभागाचे विभागप्रमुख म्हणून काम पाहिले आहे. ते ऑस्ट्रेलियातील विक्टोरियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीचे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील मानद प्राध्यापक आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच सोलापूर विद्यापीठ व विद्यापीठातील शिक्षण प्रणालीस होईल, त्यामुळे सोलापूर विद्यापीठाप्रती डॉ.कामत यांच्या असलेल्या मनोकामना व कार्यधोरण स्वामी कृपेने नक्कीच पूर्णत्वास जातील अशी आशा व्यक्त करून डॉ.कामत यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, अक्कलकोट महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.सी.आडवीतोट, लेखपाल प्रदीप हिंडोळे, प्राध्यापक शिवशरण अचलेर, श्रीशैल गवंडी, ज्ञानेश्वर भोसले, संजय पवार, प्रसाद सोनार, श्रीकांत मलवे, चंद्रकांत गवंडी, गिरीश पवार इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – कुलगुरू डॉ.रजनीष कामत, डॉ.गोरीष नाईक यांचा वटवृक्ष देवस्थानात सत्कार करताना महेश इंगळे डॉ.एस.सी. आडवीतोट व अन्य दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button