वागदरी तंटामुक्ती अध्यक्षपदी शाणप्पा मंगाणे बिनविरोध निवड …..
तंटामुक्ती अध्यक्ष निवड

वागदरी तंटामुक्ती अध्यक्षपदी शाणप्पा मंगाणे बिनविरोध निवड …..
वागदरी — येथील ग्रामसभेमध्ये महात्मा गांधी तंटामुक्त कमिटीच्या अध्यक्षपदी निवृत्त पोलिस कर्मचारी शाणप्पा मंगाणे यांची दुसर्यांना बिनविरोध निवड करण्यात आली.ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.यात विविध विषयावर चर्चा करण्यात आली.
माजी गृह मंत्री स्व.आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून पोलिसांवरील ताण कमी व्हावा ह्यासाठी निर्माण झालेल्या गृहखात्याच्या संबंधित ग्रामस्तरावरील ह्या समित्यांनी आजपर्यंत लहान मोठे तंटे गावातच सोडवून अनेक गावे अनेक गावे तंटामुक्त झाली आहेत.
दरम्यान शाणप्पा मंगाणे यांनी या आधीही तंटामुक्त अध्यक्ष काम केल्यानतंर पुन्हा एकदा संधी देण्यात आली असून या निवडीअंती त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. वागदरी गाव तंटामुक्त समितीचा वेगळा ठसा उमटवून नागरीकांना अभिप्रेत काम करणार असल्याचे श्री. मंगाणे यांनी सांगितले.
त्याबद्दल ग्रामपंचायत कडून त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच श्री परमेश्वर पर्व आराधना पालखी महोत्सव पंच कमिटी च्या वतीने कोल्हापूरी फेटा बांधून सत्कार करण्यात आले.
