भाविकांच्या भक्ती व निष्ठेमुळे श्रीगुरु स्वामींची महती वाढत चालली आहे
सांगली जि.प.अध्यक्षा स्नेहल पाटील यांचे मनोगत
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230901-WA0010-780x470.jpg)
भाविकांच्या भक्ती व निष्ठेमुळे श्रीगुरु स्वामींची महती वाढत चालली आहे
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
सांगली जि.प.अध्यक्षा स्नेहल पाटील यांचे मनोगत
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१/९/२३) – श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे ब्रम्हांडनायक आहेत. गुरूंचे गुरु आहेत. आज गुरूवारच्या मुहूर्तावर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा योग आल्यानंतर भाविकांची प्रचंड गर्दी पाहून भारावलो. स्वामी समर्थांवर भाविकांची प्रचंड श्रद्धा आहे, कारण स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत त्यामुळे निस्सीम भाविकांच्या भक्ती व निष्ठेमुळे श्री स्वामी समर्थांची माहिती अलीकडील काळात खूपच वाढत चालली असल्याचे मनोगत
सांगली जि.प.अध्यक्षा स्नेहल पाटील व अनिल पाटील यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी स्नेहल पाटील व अनिल पाटील यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी
स्नेहल पाटील बोलत होते. पुढे बोलताना स्नेहल पाटील यांनी भाविकांना मंदिर परिसरात आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे त्रास होऊ नये याकरिता विशेष दर्शन रांगेचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व स्वामी भक्तांना सुलभतेने स्वामींचे दर्शन होत असल्याचे पाहून खूपच समाधान झाले असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे संचालक अमर शिंदे, सभापती कृषि ऊत्पन्न बाजार समितीचे अनिल पाटील, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रसाद सोनार, गिरीश पवार, संजय पवार, श्रीकांत मलवे, ऋषिकेश लोणारी इत्यादी उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
फोटो ओळ – श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानात सांगली जि.प.अध्यक्षा स्नेहल पाटील व अनिल पाटील यांचा सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)