मा.शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान.
वटवृक्ष मंदिरात महेश इंगळेंच्या हस्ते सन्मान व पुरस्कार मानपत्र प्रदान

मा.शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापकांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान.

वटवृक्ष मंदिरात महेश इंगळेंच्या हस्ते सन्मान
व पुरस्कार मानपत्र प्रदान

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१/९/२३) – पंचायत समिती मा.शिक्षण विस्तार अधिकारी जाफर अब्दुल मुल्ला, कर्जाळचे केंद्रप्रमुख प्रकाश पाटील, हसापूर जि.प. मराठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र पाटील या मान्यवरांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. हा पुरस्कार वितरण सोहळा हसापूरच्या महेश इंगळे मित्र परिवारच्या वतीने येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कार्यालयात संपन्न झाला. पुरस्कार मानकऱ्यांचा मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद व जीवनगौरव पुरस्कार मानपत्र देऊन सन्मान केला. याप्रसंगी प्रथमेश इंगळे, कांबळे सर, हसापूरचे माजी सरपंच अमोल स्वामी, परमेश्वर कामाठी, राजकुमार कामाठी, मधुकर सदाफुले, आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो ओळ – जाफर मुल्ला, प्रकाश पाटील, रामचंद्र पाटील यांचा स्वामींचे कृपावस्त्र व जीवनगौरव पुरस्कार मानपत्र देऊन सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
