” प्रचंडे प्रशालेच्या बाल संस्कार केंद्रात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरे”.
श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचे कार्यक्रम
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230906-WA0040-773x470.jpg)
” प्रचंडे प्रशालेच्या बाल संस्कार केंद्रात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरे”.
नागणसूर दि.०६, अक्कलकोट तालुक्यातील नागणसूर येथील एच जी प्रचंडे प्रशालेच्या बाल संस्कार केंद्रात बाल संस्कार केंद्रातील चिमुकल्या बाळ गोपाळानी श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त दहीहंडीचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे केले. श्रीकृष्ण म्हणून कुमार विवेक धानशेट्टी, तर राधिका म्हणून कुमारी प्रज्ञा सोलापूरे यांने उत्तम रित्या पात्र भूषविले. त्यांच्यासोबत ‘ गोपाळा.. गोपाळा… देवकीनंदन गोपाळा.’ या टाळ्याच्या गजरात गोप्या म्हणून श्राव्या यळमेली, अनन्या भासगी, अथर्व गुळवे , मानसी गुळवे , राजवीर धानशेट्टी, वैभवी शरणार्थी , प्रज्ञा प्रचंडे, प्रेरणा देवरमनी, सय्यद मकानदार , आदित्य गाजरे, मैथली कल्याण, सात्विक फुलारी या सर्वांनी मिळून दहीहंडीच्या कार्यक्रमात श्रीकृष्णाला दही हंडीचे मडके फोडण्यास भाग पाडून आनंदोत्सव साजरा केले . या लहानशा बाळ चिमुकल्याना बालकेंद्राचे मुख्याध्यापिका सौ सुलोचना कडबगांवकर व सौ सीमा गंगोंडा यांचे मार्गदर्शन लाभले, त्यानुसार गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी कार्यक्रम उत्साहात पार पाडले. यावेळी प्रचंडे प्रशालेचे प्राचार्य शंकर व्हनमाने, प्राध्यापक ईरण्णा धानशेट्टी, अनिल इंगळे प्रशांत नागूरे , चिदानंद मठपती, शरणप्पा मणूरे, बसवराज कोळी, सूर्यकांत कडबगांवकर, सहशिक्षक बसवराज धानशेट्टी, संजय गंगदे, विश्वनाथ वाघमोडे, सोमशेखर कळसगोंडा, भीमाशंकर सोलापूरे,दोडमनी ,उषा वस्त्रद , वृषाली जगताप, सुनिता आलूरकर, प्रमिला विभुते , स्नेहा हिरेमठ, कुमारी झांबरे, शिक्षकेत्तर कर्मचारी थावरू चव्हाण, विश्वनाथ तळवार ,चेन्नवीर कल्याण , सागर पोद्दार, माणिक किणगी व प्रशालेतील सर्व विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)