आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर…! सोलापूर जिल्हा परिषदेच्या २४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर
सिईओ आव्हाळे यांचे तत्परतेने वेळेत पुरस्कार जाहिर

आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर…! सोलापूर जिल्हा परिषदेच्या २४ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर

सिईओ आव्हाळे यांचे तत्परतेने वेळेत पुरस्कार जाहिर


सोलापूर- जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर करणेत आले आहेत. जिल्हा स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार समितीची बैठक संपन्न झाली. या सर्व निवड प्रक्रियेचे व्हीडीओ चित्रीकरण करणेत आले. या समितीचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा ओव्हाळे या होत्या. या समिती मध्ये सदस्य म्हणून उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, महिला व बाल कल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी तथा शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नाळे, आदींनी निवड समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले. तालुका बदलून गेलेल्या शिक्षकांचे सीलबंद लिफाफे गट शिक्षणाधिकारी यांनी समिती समोर सादर केले. जिल्ह्यातील एकुण २४ शिक्षकांना पुरस्कार जाहिर झाले आहेत. जिल्हा परिषेदे मध्ये शिक्षक पुरस्कार वेळेत जाहिर झालेमुळे शिक्षकां मधून आनंदाचे वातावरण आहेत. जिल्हा परिषदेच्या सिईओ मनिषा आव्हाळे यांनी पाठपुरावा करून या पुरस्काराची घोषणा शिक्षक दिनाच्या पुर्व संध्येला करून प्राथमिक शिक्षकांनी सुखद धक्का दिला आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणा विभागाचे शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले यांनी या साठी विशेष प्रयत्न केले.

तालुका निहाय शिक्षकांची यादी पुढील प्रमाणे असून सर्वसाधारण गटात श्रीमती करूणा विजयकुमार गुरव, शाळा मिरजगी ता अक्कलकोट, श्रीमती संगिता विश्वनाथ बांगर, शाळा गाताचीवाडी बार्शी, प्रफुल बाबासाहेब सातपुते, शाळा वेद वस्ती देवळाली करमाळा, श्रीमती प्रतिभा सुभाष नवले, केदारवस्ती उपळाई, माढा, श्रीमती सोनी प्रभाकर कानडे, शाळा माळशिरस, अमित सुभाष भोरकडे शाळा आसबेवस्ती मंगळवेढा, परवेज मा रफिक शेख शाळा भोसले वस्ती मोहोळ, चंद्रकांत हनुमंत माळी, कोरके वस्ती-२ पंढरपूर, खुशाल्लोद्दीन उस्मान शेख, शाळा सांगोलकर वस्ती सांगोला, श्रीमती शुभांगी सुधाकर पवार, शाळा बिबिदारफळ ता उत्तर सोलापूर, किरण गोवर्धन भांगे शाळा माढा हायस्कूल, माध्यमिक विभाग तर यशवॅत दगडू कांबळे, शाळा इंदिरानगर मंद्रुप, दक्षिण सोलापूर यांनी विशेष पुरस्कार तर शिष्यवृत्ती साठी पुरस्कारा मध्ये अंबाराय रामन्ना उजनी, शाळा सिन्नूर अक्कलकोट, सोमेश्वर रामेश्वर देशमाने, पानगाव -२ बार्शी, श्रीमती राणी महादेव शाळा, वरकरणे ता. करमाळा,अशोक विठ्ठल ढोबळे शाळा मोडनिंब – १, श्रीमती वैशाली प्रकाश भागवत शाळा पिलीव – मुले ता माळशिरस, श्रीमती शोभा तुकारीम कोलते, शाळा भाळवणी ता मंगळवेढा, दत्तात्रय भैरू डोके, शाळा पापरी ता मोहोळ, शरद गोपाळराव बिराजदार, नेमतवाडी ता. पॅढरपूर, श्रीमती स्वाती बाळकृष्ण निळकंठ, एकतपूर ता सांगोला, श्रीमती सरस्वती संभाजी पवार शाळा अकोलेकाटी ता उत्तर सोलापूर, विलास शिवराम गिराम, शाळा संगदरी ता . दक्षिण सोलापूर यांनी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहिर झाले आहेत.
सिईओ मनिषा आव्हाळे यांनी सर्व पुरस्कार जाहिर झालेल्या शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
