शरणजी पाटील यांचा वाढदिवस कोराळ, नळवाडी येथे युवक काँग्रेस व लोककल्याण सामाजिक संस्थेच्या वतीने विविध उपक्रमाने साजरा…
वाढदिवस विशेष

शरणजी पाटील यांचा वाढदिवस कोराळ, नळवाडी येथे युवक काँग्रेस व लोककल्याण सामाजिक संस्थेच्या वतीने विविध उपक्रमाने साजरा…
मुरूम, ता. उमरगा, ता. ६ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शरणजी पाटील यांचा वाढदिवस बुधवारी (ता. ६) रोजी कोराळ, नळवाडी येथे युवक काँग्रेस व लोककल्याण सामाजिक संस्थेच्या वतीने विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. प्रारंभी कोराळ येथील मारुती मंदिर येथील विठ्ठल रुक्मिणी मुर्तीस अभिषेक करण्यात आला. त्यानंतर कोराळ येथील अंगणवाडी क्रं.२ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. यानंतर कोराळ येथील मातोश्री काशीबाई बिराजदार प्रशालेतील विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेऊन त्यातील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वाटप करण्यात आले. तसेच शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करुन प्रशालेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. नळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. या उपक्रमासाठी युवक काँग्रेसचे तथा लोककल्याण संस्था अध्यक्ष विक्रम दासमे, सचिव रवि दासमे, सतिश गायकवाड, प्रभाकर सुरवसे, बालाजी शिंदे, विठ्ठल सुरवसे, किरण दासमे, दत्तात्रय सुरवसे, हणमंत सगर, अशोक दासमे, प्रकाश पाटील, शेखर साळूंके, विजय पवार, प्रेमनाथ दासमे, बालाजी हालगरे, अंगणवाडी सेविका संगिता गोडबोले, मदतनीस जाधव, प्रशालेतील राठोड, चव्हाण, बलभीम वाघमारे, नळवाडी येथील देविदास कवठे, नेताजी कवठे, अंबादास कवठे, शाहुराज जमादार, बंकट चव्हाण, सुरेश कवठे, राजेंद्र सोनखेडे आदींसह मोठ्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते. फोटो ओळ : कोराळ, ता. उमरगा येथे शरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रशालेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करताना युवक काँग्रेसचे पदाधिकारी, ग्रामस्थ व अन्य.
