दिन विशेष

*संत सेना महाराज पुण्यतिथी हत्तुरे वस्ती येथे भक्तिमय वातावरणात साजरी*

संत सेना महाराजांच्या प्रतिमेची पूजा व आरती माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांच्या हस्ते करण्यात आला.

*संत सेना महाराज पुण्यतिथी हत्तुरे वस्ती येथे भक्तिमय वातावरणात साजरी*

सोलापूर -नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री संत सेना महाराज यांची ६५३वी पुण्यतिथी सोहळा होटगी रोड विभागातील हत्तुरे नगर, मजरेवाडी येथील नाभिक समाजाच्या वतीने सोमवार दि. ११ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता मातोश्री सिद्धव्वाबाई हत्तुरे सांस्कृतिक भवन (विमानतळासमोर) हत्तुरेवस्ती येथे व श्री संत रामलू कोंडूर यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्सव समिती अध्यक्ष सिलीसिद्ध राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संत सेना महाराजांना अखिल भाविक वारकरी मंडळ अंतर्गत 14 भजनी मंडळाकडून मंत्रमुग्ध कीर्तन,भजन,गुलालाच्या कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी झाली.

या कार्यक्रमाची सुरुवात संत सेना महाराजांच्या प्रतिमेची पूजा व आरती माजी परिवहन सभापती विजयकुमार हत्तुरे यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी समाजभूषण पुरस्कारित ह.भ.प. दत्तात्रय रामचंद्र शिरसागर व समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक पांडुरंग चौधरी सर, अखिल भाविक वारकरी मंडळाचे अध्यक्ष संजय पवार उपस्थित होते.

सकाळी दहा वाजता ह.भ.प. श्री श्याम मधुकर जोशी महाराज यांचे गुलालाचे कीर्तन झाले. कीर्तनात जोशी महाराज म्हणाले आपण कोणत्या जातीत जन्माला यावे, हे आपल्या हातात नाही, परंतु ज्या जातीत जन्माला आलो, त्या जातीची प्रतिष्ठा वाढविणे हे आपल्या हातात आहे. श्री संत ज्ञानदेव, श्री संत नामदेव यांच्या संत मंडळीतील श्री संत सेना न्हावी हे एक असे संत आहेत की, व्यवसायालाच त्यांनी परमार्थाचे रुप देऊन समाज मनाला विवेक दर्पण दाखवून उपदेश केला आहे.

श्री संत सेना महाराज यांचा जन्म मध्यप्रदेशातील बांधवगड येथे इ. स. १३०१ मध्ये नाभिक समाजात झाला. संत सेनाजींच्या जन्माने नाभिक समाजाला वेगळा मानसन्मान मिळाला आहे. श्री संत नगाजी महाराज, सद्गुरु योगीराज, श्री शंकर महाराज, श्री सद्गुरु हभप दादामहाराज सातारकर, सद्गुरु बाबा महाराज सातारकर हे नाभिक समाजात जन्माला आले. बाबा महाराज म्हणतात, ‘संतांना जात नसते, परंत आम्हाला अभिमानाने सांगावेसे वाटते की, या

संतांमुळे आमच्या नाभिक समाजाची उंची व प्रतिष्ठा वाढली आहे. नाभिक समाज हा बारा बलुतेदारांपैकी एक आहे. इतर मागासवर्गीयांमध्ये अनेक संतांनी जन्म घेऊन ओबीसींना मोठी प्रतिष्ठा मिळवून दिली आहे.’ ह भ प जोशी महाराज यांनी आपल्या रसाळ वाणीतून संत सेना महाराजांचे जीवनपट यावेळेस सांगून फुले टाकण्यात आले.

या कार्यक्रमास शिवराम कोरे, भीमाशंकर वारे,श्रीमती शोभाताई राऊत,संजय वाघमारे,अमोघसिद्ध राऊत, नागराज कोंडूर,गुरुकुल कॉम्प्युटरचे अध्यक्ष सचिन चौधरी,हिंदुराव गोरे,श्रीमती अलका ताटे,सौ.ललिता कोंडूर,श्रीमती भारती हडपद प्रभाकर राऊत,संतोष राऊत, पांडुरंग सूर्यवंशी,धोंडीराम वाघमारे,श्रीराम वाघमारे, विकी काळे,अर्जुन राऊत, राजू वाघमारे,नागेश कोरे, शिवा हडपद,विष्णू क्षीरसागर,सिद्धाराम वाघमारे, लव राऊत,अंकुश राऊत, नरसप्पा हडपद,भगवान पवार, अशोक काळे, गेटिंग हडपद, रामचंद्र ताटे, देवेंद्र गायतोंडे, मधुकर काळे, शशिकांत जाधव, रोहित वाघमोडे, श्रीनिवास अवधूर्ती, प्रभाकर मंडलिक, ईश्वर जगदाळे आदी सह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button