निवड /नियुक्ती

जिल्हा परिषद प्राथमिक शाळावि डी घरकुल शाळेच्या* *अध्यक्षपदी सज्जो पटेल*

निवड

जिल्हा परिषद प्राथमिक शाळावि डी घरकुल शाळेच्या* *अध्यक्षपदी सज्जो पटेल*

(सोलापूर प्रतिनिधी) कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विडी घरकुल ब मुले शाळेत आज शाळा व्यवस्थापन समिती पुनर्रचना सहविचार सभेचे आयोजन केले होते . यावेळी सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन विडी घरकुल ब चे कार्यवाहक विक्रम ( मुन्ना) कलबुर्गी व कुंभारी केद्राच्या केंद्रप्रमुख कुंदा राजगुरू यांच्या हस्ते पुजन करून सभेला सुरुवात करण्यात आली . या निमित्ताने पहिली ते सातवी चे बहुतांश पालक उपस्थित होते . शाळा व्यवस्थापण समितीची कार्य , जबाबदारी व निवडप्रक्रिया याविषयी केंद्रप्रमुख कुंदा राजगुरू यांनी पालकांना सविस्तर मार्गदर्शन केले. निवड करताना निवडणूक प्रक्रिया अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सज्जो पटेल तर उपाध्यक्षपदी गिता कैरमकोंडा यांची एकमताने निवड करण्यात आली . यावेळी सदस्य म्हणून परविन शेख, कल्याणी मुदगुंडी, आयेशा शेख, तनुजा शेख, नागमणी यलगोंडा, रेखा मासन, इस्मतुन शेख यांची तर शिक्षण प्रेमी म्हणून अल्ताफ पठाण यांची निवड करण्यात आली . शिक्षक प्रतिनिधी म्हणून अनुराधा काजळे तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून श्री मासन व नंदकिशोर यन्नम यांची निवड करण्यात आली. त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र घनाते , पदवीधर शिक्षक हमीदखाँ पठाण , उपशिक्षिका अनुराधा काजळे , जावेदहुसेन पठाण , सुदर्शन राठोड उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button