प्रेरणादायक

मजरेवाडी येथील देवराज प्राथमिक शाळा व श्रीनाथ माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना एम के फाउंडेशन व सागर सिमेंटच्या वतीने वही वाटप..

एम के फाउंडेशन उपक्रम

मजरेवाडी येथील देवराज प्राथमिक शाळा व श्रीनाथ माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना एम के फाउंडेशन व सागर सिमेंटच्या वतीने वही वाटप..

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

आज शांतीनगर मजरेवाडी भागातील देवराज प्राथमिक शाळा व श्रीनाथ माध्यमिक शाळा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना एम के फाउंडेशन व सागर सिमेंटच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वह्या वाटप करण्यात आल्या. याप्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व मार्गदर्शन केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

मी लहान असताना ज्या भागातून माझ्या आयुष्याच्या संघर्षाची सुरुवात झाली व पोट भरण्यासाठी एका सामान्य कुटुंबातून पुढे आलो अशा ठिकाणी आज मी गेलो असता त्या भागातील विद्यार्थ्यांना माझा प्रवास सांगताना एक वेगळाच आनंद होत होता. या भागातील विद्यार्थी हुशार व जिद्द असून येणाऱ्या काळात आई-वडिलांचे व त्या भागातील लोकांच आणि समाजाचा नाव मोठं करतील असं मनापासून वाटत होतं. शेवटी त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या
आणि हा वही वाटपाचा उपक्रम जो फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू झाला हा शैक्षणिक उपक्रम खुप समाधान देऊन जात आहे..

HTML img Tag Simply Easy Learning    

तसेच या भागातील युवकांच्या आग्रहाखातर नागनाथ देवस्थान येथे दर्शन घेतले व नागनाथ देवस्थान ट्रस्ट च्या सर्व सदस्यांशी चर्चा केली व भागातील नागरिकांशी समस्या बाबत चर्चा झाली.

याप्रसंगी आजच्या वही वाटप कार्यक्रमास उपस्थित देवराज प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ आशाराणी डोके मॅडम, श्री म्हेत्रे सर,श्री व्हरडे सर , श्री गायकवाड सर तसेच श्रीनाथ माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सातलिंग शटगार सर, श्री गिरीश शिंदे सर, सौ स्मिता राणी चिमटे मॅडम, माझे मित्र श्री कलाप्पा अहेरवाडी, सागर सिमेंटचे डीलर श्री मल्लेशी मंदोली,श्री.सिध्दाराम बगले,श्री किरण राठोड ,श्री शिवशरण मुलगे, श्री शंभुलिंग अकतनाळ सर यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी संचालक, शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button