अन्नछत्र मंडळात अमोलराजे भोसले यांच्या हस्ते मंगळावर रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ११ वा.स्थापना होणार…
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ... श्री गणेश उत्सव-२०२३*

अन्नछत्र मंडळात अमोलराजे भोसले यांच्या हस्ते मंगळावर रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ११ वा.स्थापना होणार…

*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ… श्री गणेश उत्सव-२०२३*

*🔶अक्कलकोट :(प्रतिनिधी)
*श्री गणेशोत्सवानिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे श्री शमी विघ्नेश गणेश मंदिरात श्री गणेशाच्या प्रतिष्ठापना न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांचे पुत्र न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते मंगळावर रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी ११ वा. होणार असल्याचे माहिती न्यासाचे सचिव शामराव मोरे यांनी दिली.*

श्रीक्षेत्र अक्कलकोटात अन्नछत्र मंडळ या धर्मादाय न्यासाच्या आवारात सन १९९० साली जमिनीची झाडी झुडपे काढून साफसफाई व सपाटीकरण करीत असताना जमिनीच्या मध्यवर्ती भागात शमीवृक्ष आढळला. तेथे सपाटीकरण करते वेळेस श्री गणेशाची सुंदर मूर्ती आढळली. त्याच शमीवृक्षाखाली ३३ वर्षा पूर्वी श्री गणेशाची स्थापना करून सुंदर असे मंदिर व सभामंडप बांधण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थांच्या पावन भूमीवर श्री शमीविघ्नेश गणेश असल्याने त्याचे स्थान व महात्म्य अलौकिक आहे.

या मंदिरात नित्य पूजा अर्चा, अभिषेक, अथर्वशीर्ष अभिषेक (२१ व १०० आवर्तने), सहस्त्र दुर्वार्चन, गणेश याग अशी सेवा करावयाचे असल्यास न्यासाच्या देणगी कक्षात पावती करता येते. संकष्टी व अंगारकी चातुर्तीला रात्री ८.३० वा. आरती करण्यात येते.
न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांचे सामुदायिक श्रीगणेश अथर्वशीर्ष पठणाचा कार्यक्रम मंडळ परिसरातील श्री शमीविघ्नेश् गणेश मंदिर येथे भगिनींचे रवीवार, दि. २४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आले असून नावे नोंदविण्या करिता महिला भगिनीकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

दिनांक १९ सप्टेंबर ते दिनांक २८ सप्टेंबर पर्यंत विविध अतिथींच्या हस्ते श्री गणेशांची पूजा सायंकाळी ७ वा. आयोजित करण्यात आलेली आहे. यामध्ये श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानाचे अध्यक्ष महेश इंगळे, महा वितरणाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता संजय म्हेत्रे, न्यासाचे विश्वस्त राजेंद्र लिंबीतोटे, न्यासाचे खजिनदार संजय उर्फ लाला राठोड, समाधी मठाचे पुरोहित धनंजय पुजारी, उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी, बँक ऑफ इंडिया अक्कलकोट शाखेचे व्यवस्थापक महेश घुटे, तहसीलदार बाळासाहेब सिरसट व न्यासाचे सचिव शामराव मोरे यांच्या हस्ते होणार आहे. याकमी न्यासाचे पदाधिकारी व सेवेकरी, कर्मचारी हे कार्यरत आहेत. तरी भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावेत असे आवाहन न्यासाच्या वतीने करण्यात आले.