श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात स्वामी कार्य हे अतिउत्तम, चोख व्यवस्था व स्वच्छ-सुंदर आरोग्यदायी वातावरण पाहून मन भरून आले.: सौ. मनिल मनोहर सासने, पुणे
न्यासाचे सचिव शामराव मोरे व विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230924-WA0047-780x470.jpg)
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात स्वामी कार्य हे अतिउत्तम, चोख व्यवस्था व स्वच्छ-सुंदर आरोग्यदायी वातावरण पाहून मन भरून आले.: सौ. मनिल मनोहर सासने, पुणे
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
अक्कलकोट* : (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले स्वामी कार्य हे अतिउत्तम, चोख व्यवस्था व स्वच्छ-सुंदर आरोग्यदायी वातावरण पाहून मन भरून आले असल्याचे मनोगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या भगिनी सौ. मनिल मनोहर सासने, पुणे यांनी व्यक्त केल्या.*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
त्या श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सहपरिवार आल्या असता न्यासाचे सचिव शामराव मोरे व विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी त्या बोलत होत्या.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
यावेळी माजी नगरसेवक उत्तम गायकवाड, मंडळाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब पोळ, दत्ता माने, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)