जेऊर श्री गुरु बम्मलिंगेश्वर पल्लकी महोत्सव आयोजन
सर्व पंचक्रोशीतील सद्भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावे असे श्री गुरु बम्मलिंगेश्वर पंचकमिटी कडून आवाहन
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/09/IMG-20230924-WA0046-654x470.jpg)
*|| श्री गुरु बम्मलिंगेश्वर पल्लकी महोत्सव जेऊर ||*
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
जेऊर दि. 25/09/2023,
प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही श्रावणमास व पुराण समाप्ती निम्मित श्री गुरु बम्मलिंगेश्वर जेऊर ता. अक्कलकोट येथे खालीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित केले आहे. दि. 24/9/2023 रोजी सांयकाळी जागरण समारोहासाठी येणाऱ्या भजन संघास स्वागत व इतर वादय संघास स्वागत समारंभ. तसेच दि. 25/9/2023 रोजी पहाटे 4:00 वा. श्री गुरु बम्मलिंगेश्वर लिंगास रुद्राभिषेक व महापूजा कार्यक्रम. नंतर 8:00 वा. पलक्की महोत्सवास आरंभ होणार आहे. या पल्लकी महोत्सवास श्री काशिविश्वेश्वर भजना संघ, श्री गुरुमुर्तेश्वर भजना संघ, श्री शिव भजना संघ तोळणूर, बॅजो संघ तोळणूर, डोळळ संघ जेऊर, बजन्त्री संघ जेऊर, रिद्धी-सिद्धी ढोल ताशा बसवनगर जेऊर, लेझीम संघ हायस्कूल जेऊर. मिरवणूकीसाठी उपस्थित राहणार आहेत.
जेऊर गावातील प्रमुख मार्गावरून पल्लकी महोत्सव निघणार आहे. तसेच पल्लकी समवेत महाप्रसाद वाटप करण्याचे योजिले आहे. सायंकाळी 5:00 वा. पालखी मंदिरात येईल व महाआरती व पुराण समाप्ती होणार आहे. तरी सर्व पंचक्रोशीतील सद्भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावे असे श्री गुरु बम्मलिंगेश्वर पंचकमिटी कडून आव्हान करीत आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)