सामर्थ्य आणि शक्तीचा योग्य वापर करण्याचा बोध स्वामी समर्थांनी दिला – केतकी माटेगावकर
अभिनेत्री केतकी माटेगावकरांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.

सामर्थ्य आणि शक्तीचा योग्य वापर करण्याचा बोध स्वामी समर्थांनी दिला – केतकी माटेगावकर

(श्रीशैल गवंडी-अक्कलकोट) दि.२/१०/२३) – श्री स्वामी समर्थाच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला बरेच काही शिकायला मिळते. स्वामींनी आपल्या अलौकिक चमत्कारातून व प्रचितीतून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो. श्री स्वामी समर्थ पाठीशी असल्याने अनेक गोष्टीतून आपल्याला स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती आलेली आहे, म्हणून असे बोलावेसे वाटते की माझ्या सारख्या अनेक स्वामी भक्तांना स्वामींची प्रचिती आपल्यासाठी प्रेरक ठरते. याचा अनुभव भाविकांनी स्वामींच्या नामस्मरणातून घ्यावा. स्वामींच्या प्रचितीची अघाद महिमा आजवर अनेक वेळा अनुभवण्यास आलेले आहे. स्वामी समर्थांची अफाट भक्ती माझ्याकडे असल्याने स्वामींच्या कृपेने आपण गायन सेवेच्या माध्यमातून गाता गाता केव्हा अभिनय क्षेत्रात रुळलो कळलेच नाही. हे सामर्थ्य व ही शक्ती आपल्या अंगी असल्याची जाणीव स्वामी कृपेने झाली आहे. या अनुषंगाने अंगी असलेल्या सामर्थ्य व शक्तीचा योग्य वापर करण्याचा बोध स्वामीभक्तीतूनच मिळाल्याचे मनोगत सुप्रसिद्ध मराठी गायिका व अभिनेत्री केतकी माटेगावकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महेश इंगळे यांचे सुपुत्र प्रथमेश इंगळे यांनी केतकी माटेगावकर यांचा स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी माटेगावकर बोलत होत्या. यावेळी मंदिर समितीचे मंदार महाराज पुजारी, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपूल जाधव, संजय पवार, श्रीकांत मलवे, प्रसाद सोनार, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.

फोटो ओळ – अभिनेत्री केतकी माटेगावकरांचा देवस्थान कार्यालयात सत्कार करताना प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
