महेश इंगळेंनी वटवृक्ष देवस्थानसाठी केले जीवन समर्पण – आ.बबनदादा शिंदे : टेंभुर्णी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित गौरव सोहळ्यात महेश इंगळे यांचा सन्मान
माढा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात महिलांचे योगदानही महत्त्वाचे

महेश इंगळेंनी वटवृक्ष देवस्थानसाठी केले जीवन समर्पण – आ.बबनदादा शिंदे : टेंभुर्णी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित गौरव सोहळ्यात महेश इंगळे यांचा सन्मान

माढा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात महिलांचे योगदानही महत्त्वाचे

टेंभुर्णीमध्ये कर्तुत्वान व्यक्तींच्या सन्मानप्रसंगी आ. बबनदादा शिंदेचे मनोगत

अक्कलकोट
(श्रीशैल गवंडी) –
अलीकडील काळात येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील स्वामी समर्थ दर्शनाकरिता येणाऱ्या भाविकांची संख्या खूपच वाढलेली आहे. महेश मालक आज आपल्यासाठी अक्कलकोटहून स्वामी समर्थांचा आशीर्वादच घेऊन आले आहेत. तसेच अक्कलकोट येथे जाणाऱ्या भाविकांना सर्वोत्तम स्वामी दर्शन व्यवस्था करणे हे मंदिर समितीचे प्रथम कर्तव्य आहे, ही बाब जाणून घेऊन समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी स्वतः आध्यात्मिक जीवनशैली आत्मसात करून स्वामी सेवा व वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानसाठी आपले जीवन समर्पण केले आहे असे प्रतिपादन माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी केले.

ते नुकतेच टेंभुर्णी ग्रामस्थांच्या वतीने टेंभुर्णी येथे आयोजित कर्तुत्ववान व्यक्तींच्या गौरव सोहळ्यात बोलत होते. नुकतेच विविध क्षेत्रात भरीव योगदान देऊन कर्तुत्व गाजविणाऱ्या मान्यवरांचा येथे गौरव करण्यात आला. हा गौरव सोहळा
टेंभुर्णीच्या पुष्पक मंगल कार्यालय येथे
संपन्न झाला. पुढे बोलताना आमदार बबनदादा शिंदे यांनी टेंभुर्णीचे देशमुख बंधूंनीही टेंभुर्णीचे नाव देश पातळीवर गाजवीत आहेत. माढा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात शिक्षण संस्था चालवित असताना त्यामध्ये महिलांचे योगदान महत्त्वाचे आहे संस्था जरी घरातील प्रमुख व्यक्तींनी चालू केल्या असल्या तरी त्या चालवण्याची जबाबदारी ह्या महिला घेत आहेत हे महत्त्वाचे आहे, तसेच सर्वच सत्कारमूर्तींचे कार्य मोठे आहे. असेही मनोगत आमदार बबनदादा शिंदे यांनी व्यक्त केले.

या गौरव सोहळ्यात येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांना आयकॉन ऑफ महाराष्ट्र पुरस्कार लाभल्याबद्दल, सोलापूर येथील व्हीव्हीपी इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ.जी.के.देशमुख यांना उत्कृष्ट व्यवसाय व्यवस्थापक पुरस्कार लाभल्याबद्दल, देशमुख अँड कंपनीचे संस्थापक बाळासाहेब देशमुख यांना यशस्वी उद्योगपती पुरस्कार, टेंभुर्णीचे डॉक्टर चोपडे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ.विजयकुमार चोपडे यांच्या उत्कृष्ट वैद्यकीय सेवेबद्दल व शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे सुरजाताई बोबडे, प्रणिताताई शिंदे, जयश्रीताई वाकसे यांना उत्कृष्ट शाळा व्यवस्थापनाबद्दल मान्यवरांच्या हस्ते गौरव चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन होदाडे यांनी केले. यावेळी त्यांनी कार्यक्रमाची संकल्पना व्यक्त केली. याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्राध्यापक महेंद्र कदम यांनी समायोजित मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. यावेळी रावसाहेब देशमुख, योगेश बोबडे यांनी मनोगते व्यक्त केली, तर जी.के.देशमुख सर सुरजाताई बोबडे, जयश्रीताई वाकसे यांनी सत्कारास उत्तर देताना आभार व्यक्त केले. कार्यक्रमासाठी प्रमोद कुटे मा.सरपंच अनुराधा( काकी) बोबडे, शांतीलाल बागवाले, मस्तुत सर, पंडित देशमुख, डी.के. देशमुख सर, सोमनाथ हुलगे, प्रमोद तांबे ,पी. डी.पाटील सर, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे विश्वस्त व करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती संपतराव शिंदे, प्रथमेश इंगळे, चंद्रकांत सोनटक्के,
विठ्ठल पाटील, महेश कोठारी, तनवीर मुलानी, रामभाऊ वाघमारे, हरिभाऊ सटाले, संदीप जाधव आदी मान्यवर व टेंभुर्णी परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दशरथ देशमुख, मुकुंद सुतार, एम.के.देशमुख सर, ॲड.संतोष कानडे, प्रकाश शिंदे, अतुल देशमुख, श्रीकांत लोंढे, समाधान घडके, अविनाश देशमुख, परमेश्वर खरात व संयोजन समितीने परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मोकाशी यांनी केले.
फोटो ओळ- टेंभुर्णी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित गौरव सोहळ्यात महेश इंगळे यांचा सन्मान करताना आ.बबनदादा शिंदे व मान्यवर दिसत आहेत.