“होता जिवा म्हणून वाचला शिवा” वीर जिवा महाले यांची यशोगाथा आजच्या पिढीला प्रेरणादायी : बापुराव चव्हाण
वागदरी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची ३८८ व्या जयंती साजरी करण्यात आली
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231009-WA0052-780x470.jpg)
“होता जिवा म्हणून वाचला शिवा” वीर जिवा महाले यांची यशोगाथा आजच्या पिढीला प्रेरणादायी : बापुराव चव्हाण
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
वागदरी ता अक्कलकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक शिवरत्न वीर जिवाजी महाले यांची ३८८ व्या जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भुरीकवठे केंद्रांचे केंद्र प्रमुख श्री बापुराव चव्हाण सर होते.यावेळी चव्हाण म्हणाले शिवरायांनी आपल्या अनेक वीर व निडर मावळ्यांच्या मदतीने प्रचंड मोठे हिंदवी स्वराज्य निर्माण केले, परंतु स्वराज्य निर्माण करताना अनेक असे मौल्यवान रत्न गमवावे लागले. अनेक अश्या वीर मर्द मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले आहे. यातच एक महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवरायांचे अंगरक्षक जिवाजी महाले यांची आहे.जिवाजी महाले हे एक वीर लढवय्ये होतेच या व्यतिरिक्त ते श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षकही होते, “होता जिवा म्हणून वाचला शिवा” ही म्हण यांच्या वरूनच आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
तसेच शिवरत्न वीर जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन मेजर हणमंत जमादार, व ग्रामपंचायत सदस्य राजकुमार हुगे मेजर, यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी मुंबई पोलीस रविकुमार व्हनकोरे साहेब,भुरीकवठे येथील सामाजिक कार्यकर्ते शाबुद्दीन शेख, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेंद्र पात्रे, सुनिल शिरगण, चंद्रकांत कणसे, नामदेव सुरवसे, अजय सुरवसे, महादेव पोमाजी, प्रदीप सन्मुखे, मुतांण्णा आळगे, महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट तालुका अध्यक्ष श्री शिवशरणप्पा सुरवसे, आदी समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थित मान्यवरांचा फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)