सामाजिक बांधिलकी

खेडगी परिवाराच्यावतीने शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त रविवारी घटस्थापनेसाठी लागणारे सुमारे १० हजार लिटर गोडेतेल नागरिकांना अल्प दरात वाटप…

*परंपरा अखंडितपणे सुरू राहणार*

खेडगी परिवाराच्यावतीने शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त रविवारी घटस्थापनेसाठी लागणारे सुमारे १० हजार लिटर गोडेतेल नागरिकांना अल्प दरात वाटप…

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट, दि. १५- खेडगी परिवाराच्यावतीने शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त रविवारी घटस्थापनेसाठी लागणारे
सुमारे १० हजार लिटर ( अर्थात १० टन )
गोडेतेल नागरिकांना अल्प दरात वाटप करण्यात आले. शहर व तालुक्यातील हजारो भाविकांनी लाभ घेऊन समाधान व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

सुरुवातीला दानशूर चनबसप्पा खेडगी व त्यानंतर शिवशरण खेडगी यांनी सुरु केलेली सुमारे ५५ वर्षापूर्वीची परंपरा अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी परिवाराने पुढे निरंतरपणे चालू ठेवली आहे. प्रारंभी शहरातील तूप चौकातील मंडपात श्री स्वामी समर्थ महाराज तसेच चनबसप्पा खेडगी, नीलव्वाबाई खेडगी, शिवशरण खेडगी या दिवंगतांच्या प्रतिमेचे पूजन बसलिंगप्पा खेडगी
यांच्या हस्ते करून तेल वाटपास सुरुवात झाली. यावेळी माजी नगराध्यक्षा शोभा खेडगी, अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे सचिव सुभाष धरणे,
व्हाइस चेअरमन अशोक हारकुड, ज्येष्ठ संचालक अॅड. अनिल मंगरुळे, चंद्रकांत स्वामी, श्रीशैल भरमशेट्टी, प्राचार्य डॉ. शिवराय आडवितोट, माजी सैनिक अनिल हत्ते, चन्नवीर खेडगी, स्तुती खेडगी, दिनेश धाराशिवकर, विरुपाक्ष कुंभार उपस्थित होते.
अल्प दरातील गोडेतेल
घेण्यासाठी शहर व तालुक्यातील नागरिकांनी गर्दी केली होती.

तेल वाटप यशस्वी करण्यासाठी अरुण इचगे, गुरुनाथ कलशेट्टी, सिध्दाराम इचगे, शिवानंद बाळीकाई, राजशेखर लोकापूरे, दत्तात्रय कलशेट्टी, सिध्दाराम अरबाळे, सितापती कामाठी, बाबुराव बोलदे, रमेश पुजारी, हणमंत कोळी, मुत्तण्णा वाले, प्रशांत कडबगांवकर, धनंजय गडदे, विजय माळाबागी, अंबादास खरटमल,गुरुशांत चौधरी
शिवानंद भासगी व खेडगी मित्र मंडळाने परिश्रम घेतले.

खेडगी परिवाराबरोबरच सिद्धेश्वर बँकेचे संचालक बसवराज माशाळे बसवराज गोरे, स्वर्गीय चंद्रसेन राठोड यांच्या स्मरणार्थ शैलेश राठोड, मुन्ना राठोड, विकास राठोड, लखन राठोड, मल्लेशप्पा गोरे परिवारानेही ऐतिहासिक कारंजा चौक व बसस्थानक परिसरात नागरिकांना अल्प दरात गोडेतेल वाटप केले.

चौकट —+
*परंपरा अखंडितपणे सुरू राहणार*
आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, त्याच उद्देशाने असे रक्तदान शिबीर, कोजागिरी पौर्णिमेला श्रीक्षेत्र तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मोफत बससेवा,
गोरगरिबांना विविध प्रकारच्या मदतीचा हात देऊन आधार दिला आहे. आजोबानंतर वडिलांनी
चालू केलेली जनसेवेची परंपरा आम्ही अखंडितपणे चालू
ठेवली आहे.
— बसलिंगप्पा खेडगी

चौकट —
समाजातील गरीब व गरजू नागरिक- महिलांना नवरात्र महोत्सवाच्या घटस्थापना करण्यासाठी अल्प दरात गोडे तेल उपलब्ध करून देण्याचा खेडगी परिवाराचा मानस आहे.त्यातच
महागाईने सामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात काही रुपयांची दरवाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडते. अशा परिस्थितीत तब्बल १० हजार लिटर गोडे तेल
सुमारे १० ते १२ तास पर्यंत अल्प दरात वाटप करणा-या खेडगी परिवारचे कार्य आदर्शवत आहे.
– अनिल हत्ते
माजी सैनिक

फोटो ओळ —
अक्कलकोट :- अक्कलकोट एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन बसलिंगप्पा खेडगी परिवाराच्यावतीने शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त घटस्थापनेसाठी अल्प दरात गोडेतेल वाटप करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button