वारद चाळ नवरात्र महोत्सव मंडळ श्री देवी स्थापना मिरवणुक, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते पुजा करून मिरवणुकीस जल्लोषात सुरु करण्यात आली
वारद चाळ, आणि परिसरातील हजारो नागरिक, मंडळाचे कार्यकर्ते, भाविक उपस्थित होते

वारद चाळ नवरात्र महोत्सव मंडळ श्री देवी स्थापना मिरवणुक, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते पुजा करून मिरवणुकीस जल्लोषात सुरु करण्यात आली

दिनांक :- १५ ऑक्टोम्बर २०२३


वारद चाळ नवरात्र महोत्सव मंडळाचे आधारस्तंभ चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली, सालाबादप्रमाणे यंदाहि वारद चाळ नवरात्र महोत्सव मंडळ श्री. देवी स्थापना मिरवणूक दत्त चौक येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, आमदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते तसेच पोलिस आयुक्त राजेंद्र माने, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक, शिवसेना जिल्हा प्रमुख अमोलबापु शिंदे, डेप्युटी कलेक्टर समाधान घुटूकडे, पोलिस उप अधीक्षक नानासाहेब माशाळे, जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे, फौजदार चावड़ी पोलिस स्टेशन चे सिद्ध साहेब, अनिकेत पिसे, पृथ्वीराज नरोटे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पूजा करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.

महाराष्ट्राची पारंपरिक ओळख असलेली सोलापूरचे लेझीमचे मर्दानी खेळ मंडळाचे आधारस्तंभ चेतनभाऊ नरोटे यांच्या नेतृत्वाखाली मंडळातील एक हजाराहून अधिक सदस्यांनी लेझीमचा शिस्तबद्ध भव्य दिव्य बहारदार लेझीम डाव सादर करून सर्वांचे लक्ष वेधले.

याप्रसंगी वारद चाळ, आणि परिसरातील हजारो नागरिक, मंडळाचे कार्यकर्ते, भाविक उपस्थित होते.
*शारदीय नवरात्र उत्सव व घटस्थापना निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा! आई जगदंबेच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येवो. हिच प्रार्थना : चेतनभाऊ नरोटे*