स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार गावगाथा दिवाळी अंकास जाहीर.. येत्या शनिवारी कराड येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळा
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे पुरस्कार जाहीर
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231015-WA00701-578x470.jpg)
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय उत्कृष्ट दिवाळी अंक पुरस्कार गावगाथा दिवाळी अंकास जाहीर.. येत्या शनिवारी कराड येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळा
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे पुरस्कार जाहीर
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावचे धोंडपा नंदे यांनी पहिल्यांदाच गावगाथा दिवाळी अंक 2022 प्रकाशित केला वाचकांच्या पसंतीस उतरला पहिल्या वर्षी चार पुरस्कार मिळाले आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0002.jpg)
पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने कला, सामाजिक, शैक्षणिक, साहित्य, वैद्यकीय, उद्योग, कृषी व क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था मंडळे यांना राज्यस्तरीय प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड देवून गौरवण्यात येणार आहे.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0001.jpg)
स्पंदन जीवन गौरव पुरस्कार प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे यांना देण्यात येणार असून या पुरस्काराचे स्वरुप रोख रक्कम पाच हजार रुपये, मानपत्र, ग्रंथ आणि कोल्हापूरी फेटा असे आहे.
2022 मधील पुरस्काराची घोषणा ट्रस्टचे डाॅ.संदीप डाकवे यांनी केली आहे. यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष आप्पासोा निवडूंगे, सचिव सौ.रेश्मा डाकवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातुन प्रस्ताव मागवले होते. सुमारे 200 प्रस्तावामधून 30 व्यक्ती व संस्था यांची निवड केली आहे.
सदरील पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे. यावर्षी डाॅ.स्वाती मोरे, रुपाली पाटील, डाॅ.गणेश पाटील, रेखा जाधव, शिवराज फाटक, ह.भ.प.दिलीप पाटील, संतोष पवार, मुरलीधर दाभाडे, सतीश वाघ, ह.भ.प.मधुकर महाराज, दीपक लोखंडे, ह.भ.प.विजय महाराज, सुनील रासकर, ह.भ.प.रामदास महाराज, सीमा देसाई, संजय बदियाणी, विजय काळे, अधिकराव माने, रविंद्र देशमुख, रवि बोडके, रवि ढगे, पाटण तालुका पत्रकार संघ, स्वाती पाटील, सुनील शेडगे, सा.कुमजाई पर्व, सविता शिंदे यांना प्राईड ऑफ स्पंदन अवॉर्ड देवून सन्मानित करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय स्व.राजाराम डाकवे (तात्या) साहित्य पुरस्काराने नंदकुमार शेडगे, प्रा.डाॅ.सुभाष वाघमारे, आशिष निनगुरकर, सचिन अवघडे, प्रा.डॉ.अरुण घोडके, आनंदा ननावरे यांचा सन्मान केला जाणार आहे.
याशिवाय याच कार्यक्रमात सर्जनशीलतेचा नवाविष्कार, ग्रामसेवा, गावगाथा, सुभाषित, रंगतदार, धगधगती मुंबई, गुंफण, शब्द शंकरपाळी, गझल अमृत, अवतरण सकाळ, आयुश्यमान, कृष्णाकाठ, यशवंतनगरी या दिवाळी अंकांना, सेल्फी विथ गुढी या स्पर्धेतील ऐश्वर्या काटकर, चैतन्य करमरकर, जयवंत सावंत, विक्रम करपे, कविता कचरे, डाॅ.बलराज पाटील यांचा तर भित्तीचित्र काव्य प्रदर्शनातील भूषण तांबे, प्रकाश सकुंडे, सचिन अवघडे, संगिता केंजळे, क्रांती पाटील, प्रा.बाळासाहेब हिरे, कवी हनुमंत चांदुगडे, कवी महेश पवार, शिवाजी मस्कर, छायाताई बैस, दिपाली साळवी, सत्यवान मंडलिक, अंवतिका महाडीक, संदीप कांबळे यांचा सन्मान केला जाणार आहे.
या पुरस्कारांचे वितरण शनिवार दि.21 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 10 वाजता यशवंतराव चव्हण स्मृती सदन (टाऊन हाॅल) कराड, ता.कराड, जि.सातारा येथे होणार आहे. याप्रसंगी महाराष्ट्र केसरी पै.आप्पासाहेब कदम, प्रा.ए.बी.कणसे, कृष्णाकाठ न्यूज नेटवर्क चे चंद्रकांत चव्हाण, लिम्का बुक ऑफ होल्डर डाॅ.राजेंद्र कंटक, ह.भ.प.विजय महाराज, अभिनेता सचिन पाटील, अभिनेत्री प्राजक्ता शिसोदे, अभिनेते नितीन गवळी, टीव्ही अँकर स्वाती गोडसे, डाॅ.संदीप डाकवे व अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.