गावगाथा

*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने अक्कलकोट शहरात भव्य पथसंचलन*

विजयादशमी निमित्त काढण्यात आले असून, या पथसंचलनात शेकडो स्वयंसेवक सामील

अक्कलकोट :* दि.२६ (प्रतिनिधी)
*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने अक्कलकोट शहरात भव्य पथसंचलन विजयादशमी निमित्त काढण्यात आले असून, या पथसंचलनात शेकडो स्वयंसेवक सामील झाले होते.*

HTML img Tag Simply Easy Learning    

विठ्ठल मंदिरजवळील श्रीमंत कमलाराजे चौक येथून पथसंंचालनाची सुरुवात करण्यात आली. या पथसंंचालनात संघाचा गणवेश घातलेले स्वयंसेवक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. तसेच अर्ध गणवेश व नागरी वेशातसुद्धा स्वयंसेवक सामील झालेले होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

हे संचलन नगरपालिकामार्गे विजय कामगार चौक,एसटी बस स्टॅन्ड, श्री मल्लिकार्जुन मंदिर,समाधी मठ,कारंजा चौक,मौलाली गल्ली, आझाद गल्ली,डबरे गल्ली,देशमुख गल्ली,भारत गल्ली,राम गल्ली, मधला मारुती,सुभाष गल्ली,दक्षिण पोलीस ठाण्यासमोरून कापड लाईन,स्वा.सावरकर चौक,समर्थ चौक,राजे फत्तेसिंह चौक,जुना तहसील कार्यालय समोरून उखले गल्ली मार्गे श्रीमंत कमलाराजे चौकात समारोप करण्यात आला.

HTML img Tag Simply Easy Learning    

प्रारंभी संचालनाच्या सर्व सूचना तालुका कार्यवाह चेतन जाधव यांनी उपस्थित स्वयंसेवकांना दिल्या. संचनात शिस्तबद्ध स्वयंसेवक,संघाचा घोष हे संचालनाचे वैशिष्ट्य ठरले. शहरात अनेक ठिकाणी व प्रमुख मार्गावर गुलाबपुष्पांचा वर्षाव करून स्वागत करण्यात येत होते. रस्त्याच्या दुतर्फा नागरिक थांबून संचलन पाहत होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

या संचलनात सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा संघचालक सुनील इंगळे,जिल्हा व्यवस्था प्रमुख उमाकांत चाफेकर, जिल्हा प्रचारक सुशांत पांडकर, धर्मजागरण विभागाचे जिल्हा संयोजक प्रसाद हारकुड,जिल्ह्याचे बौद्धिक प्रमुख संतोष वगाले, तालुका संघचालक रवींद्र जोशी,तालुका कार्यवाह चेतन जाधव,ज्येष्ठ स्वयंसेवक गुंडूअण्णा येळमेली,राजु कोरे,चंद्रकांत जकापुरे,आनंद देसाई,सायबन्ना सोनकांबळे,बसवराज साखरे,शिवशंकर स्वामी,समर्थ देशमुख,मिलिंद पाटील,सुभाष सुरवसे,राजशेखर उंबराणीकर,नीलकंठ कापसे,रमेश कापसे,विलास कोरे,महेश वागदारे,संदीप कटकधोंड, आदित्य जोशी,ओंकार पाठक,अक्षय सरदेशमुख,रेवणसिद्ध हिरेमठ, तम्मा शेळके,महेश शेडम,आमदार सचिन कल्याणशेट्टी,मिलन कल्याणशेट्टी,सागर कल्याणशेट्टी,आनंद तानवडे,महेश हिंडोळे,कांतु धनशेट्टी,शिव जोजन,सिद्धाराम टाके,मनोज सक्करगी आदीसह सुमारे ५०० स्वयंसेवक संचालक सामील होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट शहरातसुद्धा श्री मल्लिकार्जुन मंगल कार्यालयमध्ये विजयादशमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी संघाचे प्रांतिक सदस्य मदन मोरे हे प्रमुख वक्ते होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पसारे क्लासेसच्या संचालिका मल्लम्मा पसारे व उद्योगपती सुनील बिराजदार हे उपस्थित होते.

तसेच मैंदर्गी येथे संचलन व विजयादशमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मैंदर्गी येथे उत्सवासाठी प्रमुख वक्ते म्हणून अभिजीत लोके हे उपस्थित होते. शहरातील प्रमुख मार्गावरून संचालन काढण्यात आले. तसेच तडवळ व अरगी या गावात सुद्धा संघाचा उत्सव व संचालन शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आले.

आळगी येथे तालुका प्रचारक यश कुलकर्णी यांनी तर तडवळ येथे माजी प्रा.भीमराव साठे यांनी बौद्धिक दिले. तालुक्यातील सर्व ठिकाणी झालेल्या संचलन व विजयादशमीच्या उत्सवात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता.

*चौकट :*
अक्कलकोट शहरासह तडवळ, आळगी ,मैंदर्गी या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पथसंचलन, शेकडो स्वयंसेवक सामील.

*फोटो ओळी :* अक्कलकोट शहरात विजयादशमीनिमित्त काढण्यात आलेल्या संचालनात सहभागी स्वयंसेवक.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button