पुरस्कार सन्मान

उपक्रमशील शिक्षक विश्वनाथ पांचाळ यांना आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान

गांधी शाळेचे प्रिन्सिपॉल अनिल पांचाळ, पर्यवेक्षक रवींद्र खोंडे आणि सर्व सहकाऱ्यांनी पुरस्कार मिळाल्याने पांचाळ सरांचे अभिनंदन केले आहे.

उपक्रमशील शिक्षक विश्वनाथ पांचाळ यांना आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार प्रदान

HTML img Tag Simply Easy Learning    

मुंबई प्रतिनिधी
गणेश हिरवे

HTML img Tag Simply Easy Learning    

HTML img Tag Simply Easy Learning    

५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त देण्यात येणारा राज्य स्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार दिनांक २९ ऑक्टोबर २०२३ रोजी विश्वनाथ पांचाळ, गांधी बाल मंदिर हायस्कूल कुर्ला येथील शिक्षक व एनसीसी ऑफिसर यांना रायबा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कल्याण येथील लक्ष्मी नारायण देवस्थान सभागृहात पदाधिकाऱ्यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.पांचाळ सर
गांधी बाल मंदिर हायस्कूल मध्ये गेली ३१ वर्ष कार्यरत असून विविध सहशालेय उपक्रमात भाग घेऊन अनेक पारितोषिके मिळाली आहेत.
लोकसंख्या शिक्षण सहशालेय उपक्रमात राज्यस्तरावर उपक्रमाची निवड झाली होती.

HTML img Tag Simply Easy Learning    

एनसीसीच्या माध्यमातून स्वच्छ भारत अभियान, साक्षरता अभियान, पर्यावरण रक्षण, तंबाखू मुक्त अभियान, रस्ता सुरक्षा मोहीम, हेल्मेट वाटप, प्लास्टिक बंदी-कापडी पिशव्यांचा वापर, वृक्षारोपण, स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव, माझी माती माझा देश अभियान, युद्ध नौका भेट विविध उपक्रमातून भावी आदर्श सैनिक घडवण्याचा प्रयत्न करून आज अनेक विद्यार्थी सैन्यात भरती झालेल्या आहेत.
शालेय उपक्रमात विविध चित्रकला स्पर्धा, फलक लेखन, करोना काळातील: शैक्षणिक साहित्य व किराणा वाटप, लसीकरण मोहीम आदी विविध उपक्रमाद्वारे सामाजिक बांधिलकी जपण्याचा त्यांचा कायमच प्रयत्न असतो..गांधी शाळेचे प्रिन्सिपॉल अनिल पांचाळ, पर्यवेक्षक रवींद्र खोंडे आणि सर्व सहकाऱ्यांनी पुरस्कार मिळाल्याने पांचाळ सरांचे अभिनंदन केले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button