जनसेवा करण्यास स्वामी कृपेचे पाठबळ आवश्यक – आ.सचिनदादा कल्याणशेट्टी : वाढदिवसा प्रित्यर्थ स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर काढले भावोद्गार
वटवृक्ष मंदिरात आमदार कल्याणशेट्टींचा सत्कार करताना महेश इंगळे महेश हिंडोळे व अन्य दिसत आहेत.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/11/IMG-20231106-WA0037-612x470.jpg)
जनसेवा करण्यास स्वामी कृपेचे पाठबळ आवश्यक – आ.सचिनदादा कल्याणशेट्टी : वाढदिवसा प्रित्यर्थ स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर काढले भावोद्गार
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.६/११/२३) – तालुक्यातील शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय धार्मिक आदींसह विविध क्षेत्रात समाजकार्य करण्यात आपल्या कल्याणशेट्टी परिवाराचे नेहमीच योगदान आहे. बौद्धिक व्याख्यानमाला, योग शिबिर, सामुदायिक विवाह सोहळे, रक्तदान शिबिरे, यासह आजवर अनेक उपक्रम राबवित आल्याने तालुक्यातील जनतेने त्यांच्या हृदयात आपल्याला स्थान दिलेले आहे. या माध्यमातूनच आमदारकीची माळ गळ्यात घालत तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने विधानसभेत पाठविले. जनतेचा हा विश्वास सार्थ ठरविण्याकरिता यापुढील काळातही जनतेची सेवा करण्याकरिता स्वामी समर्थांच्या कृपेचे पाठबळ आवश्यक असल्याचे प्रतिपादन तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी केले. नुकतेच आ.सचिनदादा कल्याणशेट्टी यांनी आपल्या वाढदिवसा प्रित्यर्थ येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होत स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी आमदार कल्याणशेट्टी यांचा श्री स्वामी समर्थांचे
कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सन्मान केला. यावेळी बोलताना आमदार कल्याणशेट्टी यांनी वरील भावोद्गार काढले. यावेळी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनीही आमदार कल्याणशेट्टी यांचा सत्कार केल्यानंतर वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, व्यंकटेश पुजारी, तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, नगरसेवक महेश हिंडोळे, नागेश कुंभार, विक्रम शिंदे आदींसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
फोटो ओळ – वटवृक्ष मंदिरात आमदार कल्याणशेट्टींचा सत्कार करताना महेश इंगळे महेश हिंडोळे व अन्य दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)