अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे कार्य धार्मिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्य देखील प्रेरणा देणारे; शिवाजीराव कपाळे
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे कार्य धार्मिक क्षेत्राबरोबरच सामाजिक कार्य देखील प्रेरणा देणारे असल्याचे मनोगत अहमदनगर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे संचालक शिवाजीराव कपाळे यांनी व्यक्त केले.*

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी यांच्या हस्ते श्रींची मूर्ती, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

त्यांच्या समवेत स्नेहलोक पतसंस्थेचे पिंटू भासगी, भीमाशंकर वग्गे हे उपस्थित होते. यावेळी कागल जिल्हा कोल्हापूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर यांचा देखील न्यासाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी न्यासाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसले, एस.के.स्वामी, सिद्धाराम कल्याणी, बाळासाहेब पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, निखिल पाटील, गोटू माने महांतेश स्वामी, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे, शरद भोसले, चंद्रकांत हिबारे, संभाजीराव पवार यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
