श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट

अक्कलकोट त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात भव्य दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लख..! लख..!! दिव्यांनी न्यासाचा परिसर उजळून निघाला

यात्री निवास येथे कोल्हापूर येथील भक्ती गंध सेवा प्रतिष्ठानच्या वतीने रांगोळी साकारून लक्षदिपोत्सव करण्यात आला.

अक्कलकोट त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अन्नछत्र मंडळाच्या प्रांगणात भव्य दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लख..! लख..!! दिव्यांनी न्यासाचा परिसर उजळून निघाला

HTML img Tag Simply Easy Learning    

🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ व न्यासाची सहयोगी संस्था असलेल्या हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने हिरकणी सखी मंच्याकडून त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त न्यासाच्या प्रांगणात भव्य दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. लख..! लख..!! दिव्यांनी न्यासाचा परिसर उजळून निघाला होता.*

HTML img Tag Simply Easy Learning    

दरम्यान न्यासाच्या प्रांगणात महाप्रसाद गृह समोरील कपिला गाय येथे दीप लाऊन भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला. सदरचा कार्यक्रम संस्थेचे आधारस्तंभ व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाला.

HTML img Tag Simply Easy Learning    

कार्तिक पौर्णिमेला धार्मिकतेत महत्व असून यानिमित्त सालाबादाप्रमाणे न्यास व हिरकणी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दीपोत्सव या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. न्यासाच्या परिसरात विविध ठिकाणी दीपोत्सव करण्यात आले होते. त्रिपूर पौर्णिमेनिमित्त त्रिपूर वाती लावण्याची परंपरा असून, यादिवशी शंकराने तीन असुरांचा वध केला, अशीही आख्यायिका आहे. त्यामुळे यादिवशी त्रिपूर वात लावली जाते. म्हणून दीपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

HTML img Tag Simply Easy Learning    

कार्तिकी एकादशीपासून सुरू झालेले तुळशी विवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी दीपोत्सवाला महत्व आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

म्हणूनच त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त न्यासाच्या प्रांगणात भव्य दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दरम्यान न्यासाच्या यात्री निवास येथे कोल्हापूर येथील भक्ती गंध सेवा प्रतिष्ठानच्या वतीने रांगोळी साकारून लक्षदिपोत्सव करण्यात आला.

याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा अलकाताई भोसले, उपाध्यक्षा रत्नमाला मचाले, सचिवा अर्पिताराजे भोसले, खजिनदार स्मिता कदम, सुवर्णा घाडगे, स्वप्ना माने यांच्यासह न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे यांच्यासह पदाधिकारी, सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button