वटवृक्ष मंदिरातील नियोजनबद्ध दर्शन व्यवस्थेमुळे भाविकांची संख्या वाढत आहे – नाट्य कलाकार मालपेकर
सविता मालपेकर व सहकालाकारांचा श्री वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/11/IMG-20231127-WA0035-709x470.jpg)
वटवृक्ष मंदिरातील नियोजनबद्ध दर्शन व्यवस्थेमुळे भाविकांची संख्या वाढत आहे – नाट्य कलाकार मालपेकर
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)
(प्रतिनिधी अक्कलकोट, – येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचे देश विदेशासह राज्यभरात अनेक स्वामी भक्त आहेत. वटवृक्ष मंदिरातील भौतिक सौंदर्य येणाऱ्या भाविकांचे मन मोहून घेत आहे. नुकतेच आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आम्हाला स्वामी दर्शनाच्या कारणाने अक्कलकोटला येण्याचा योग आला. स्वामी भक्तांची संख्या पाहून स्वामींचे दर्शन लवकर होईल की नाही अशी आमची मनोकामना झाली होती, परंतु मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आमच्या मंदिरातील आगमनाची दखल घेऊन तात्काळ स्वामी दर्शनाची उत्तम व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्या गर्दीतही महेश इंगळे साहेबांच्या कृपेमुळे लवकरात लवकर स्वामी दर्शनाचा दुर्मिळ योग लाभला. त्यामुळे मन प्रसन्न झालेले आहे. केवळ आमच्यासाठीच नाही तर येथे येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांसह अबालवृद्धांसाठी महेश इंगळे हे नियमीतपणे स्वतः वटवृक्षाखाली उभे राहून सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुरळीत व सुलभतेने कसे होईल याकडे जातीने लक्ष देतात. स्वामी दर्शनाकामी कुठल्याही भाविकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जाण्याचा प्रसंग आल्यास त्यांना तातत्काळ मदतीचा हात देतात. हे आज आमच्या निदर्शनास आले आहे. या निमित्तानेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील नियोजनबद्ध दर्शन व्यवस्थेमुळे स्वामी भक्तांची संख्या वाढत असल्याचे मनोगत छोट्या पडद्यावरील मराठी नाट्य कलाकार सविता मालपेकर यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांनी नाट्य कलाकार सविता मालपेकर, सहकलाकार स्मिता जयकर, अर्चना नेवरेकर, रेखा सहाय यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी मालपेकर बोलत होत्या. पुढे बोलताना मालपेकर यांनी वटवृक्ष मंदिरातले नियोजन उत्तम व आदर्शवत असल्याचे मनोगतही मालपेकर यांनी व्यक्त केले. यावेळी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार, विपुल जाधव, स्वामीनाथ लोणारी, प्रसाद सोनार, संजय पवार, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, गणेश इंगळे, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0004.jpg)
फोटो ओळ – सविता मालपेकर व सहकालाकारांचा श्री वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2024/12/IMG-20241212-WA0003.jpg)