“श्री क्षेत्र तीर्थ येथील मोहरम: एकात्मतेचे प्रतिक” प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार
वैशिष्ट्यपूर्ण मोहरम
![](https://gaongatha.com/wp-content/uploads/2023/07/IMG-20230727-WA0053-780x470.jpg)
“श्री क्षेत्र तीर्थ येथील मोहरम: एकात्मतेचे प्रतिक”
प्रा.डॉ. भीमाशंकर बिराजदार
श्री क्षेत्र तीर्थ (ता.द.सोलापूर)दि.२७ भारतात सण उत्सवाच्या माध्यमातून समाजात बंधुता,प्रेमभाव रुजविण्यासाठी व एकोपा वाढविण्यासाठी आपल्या पूर्वजांनी सण उत्सव साजरा करण्याची परंपरा निर्माण केली. दिवाळीत फराळाच्या निमित्ताने व रमजान मध्ये सुरखुर्माच्या निमित्ताने एकमेकांना भेटणे शुभेच्छा देणे यातून सलोखा वाढण्यास मदत होते. मोहरम उत्सव त्यापैकीच एक
तीर्थ येथील मोहरमचे वैशिष्ट्य म्हणजे ईमामखाशिम,हुसनबाशा,मौलाली,बाराईमाम, नालसाब उर्फ ईमामखाशिम असे पाच पंजे म्हणजे पीर बसविले जातात. हे पीर पकडणारे भक्त (घोडे) ग्रामदैवत रामलिंगेश्वर मंदिरात जाऊन नारळ वाढवून नंतर पीर पकडतात. गावातील प्रत्येकांच्या घरी जाऊन ऊद घेतात .भक्तांच्या समस्येवर उपाय सूचवितात त्यामुळे भक्तांना आपल्या समस्या सुटतात असा विश्वास आहे. अख्खं गाव या दैवतांची. पूजा करुन नैवेद्य दाखवतात.
मोहरमच्या दिवशी दुपारी भाकणूक करुन वर्ष भरातील राजकीय, सामाजिक, पीकपाणी या संदर्भात कथन केले जाते. त्यानंतर रामलिंगेश्वर मंदिरात उत्सवाची सांगता होते संपूर्ण गाव या उत्सवात सहभागी होते.
![Simply Easy Learning](https://gaongatha.com/wp-content/uploads/2025/02/WhatsApp-Image-2025-02-13-at-11.09.12_69278b7d.jpg)