गावगाथा

गुरुकुल शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन थाटात साजरे

येथील गुरुकुल प्री प्रायमरी इंग्रजी शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त बालकलाकारांनी थरला ठेका

गुरुकुल शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन थाटात साजरे

मुरूम, ता. उमरगा, ता. ११ (प्रतिनिधी) : येथील गुरुकुल प्री प्रायमरी इंग्रजी शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन शनिवारी ( ता.१०) रोजी स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयात थाटात साजरे झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. सायबण्णा घोडके होते. यावेळी प्राचार्य दिलीप इंगोले, डॉ. दत्तात्रय पाटील, राजकुमार माने, डॉ. रामलिंग पुराणे, अजित चौधरी, डॉ. प्रीती चिलोबा, पुष्पा गव्हाणे, कलावती काबरा, रत्नमाला कारभारी आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते द्वीपप्रज्वलन करून छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून उद्घाटन करण्यात आले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. बालकलाकारांनी विविध मराठी, हिंदी गाण्याच्या तालावर ठेका धरत प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. पालक व नागरिकांनी या बालकलाकाऱ्यांच्या कलागुणांचे कौतुक करून भरभरून दाद दिली. या सांस्कृतिक कार्यक्रमास तबला वादक चंद्रसेन दोघे, हार्मोनियम वादक वासुदेव आप्पाना यांनी संगीताची साथ दिली. अध्यक्षीय समारोप डॉ. सायबण्णा घोडके यांनी केला. या प्रसंगी डॉ. पुराणे, माने, चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले. अपर्णा पोतदार, अनिता वडतिले, सुनीता सोबाजी, आयेशा नुरसे, दिंगबर वडतीले, रियाज नुरसे, श्रीकांत भोज आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मयुरी चौधरी, आनंद चौधरी तर आभार भूषण मडवळी यांनी मानले.

फोटो ओळ : मुरुम, ता. उमरगा येथील गुरुकुल प्री प्रायमरी इंग्रजी शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त बालकलाकारांनी थरला ठेका

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button