ग्रामीण घडामोडी

अक्कलकोट राज्यातील ‘टॉप फाईव्ह’चे तीर्थक्षेत्र असूनही येथील बसस्थानकाची मोठी दुरावस्था …

हजारो स्वामी भक्तांतून व प्रवाशी वर्गातून नाराजी ..

 

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट राज्यातील ‘टॉप फाईव्ह’चे तीर्थक्षेत्र असूनही येथील बसस्थानकाची मोठी दुरावस्था …

HTML img Tag Simply Easy Learning    

हजारो स्वामी भक्तांतून व प्रवाशी वर्गातून नाराजी ..

HTML img Tag Simply Easy Learning    

अक्कलकोट, दि.3 : तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील बस स्थानकामध्ये संपूर्ण राज्यातील राज्य परिवहन महामंडळ व कर्नाटक महामंडळाच्या बसेस मोठ्या प्रमाणात येतात. मात्र या बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात वर्दळ असूनही बस स्थानकातून बस बाहेर काढणे व प्रवेश करणे अत्यंत जिकरीचे होत आहे. यामुळे अपघात होण्याची मोठी शक्यता नाकारता येत नाही. बस स्थानकाच्या प्रवेशव्दारावर चोहोबाजुने फळ विक्रेते, फेरीवाले, अवैध वाहतुकीचे वाहने व प्रवासी उचलण्यासाठी थांबणार्‍या ऑटो रिक्शाने बसस्थानकास घेरटा घातला आहे. मुळातच बसस्थानक मोडकळीस आले आहे. राज्यातील ‘टॉप फाईव्ह’चे तीर्थक्षेत्र असूनही येथील बसस्थानकाची मोठी दुरावस्था झाल्याने अक्कलकोट तीर्थक्षेत्राची अब्रूची लक्तरे वेशीवर आली आहेत. स्वामी भक्तांतून व प्रवाशी वर्गातून बसस्थानकाच्या दूरावस्थेबद्दल व बीओटी तत्वावर बसस्थानकाचे नूतनीकरणाचे निर्णयास होत असलेल्या विलंबाबद्दल व शासनाच्या उदासिनतेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील प्रमुख तिर्थक्षेत्रापैकी अक्कलकोट तीर्थक्षेत्र गणले जाते. येथे येणार्‍या स्वामीभक्त, पर्यटकांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. अक्कलकोट बसस्थानकात पहाटे 5 वा. पासून वेंगूर्ले, देवगड, सातारा, रत्नागिरी, नगर, पुणे, वल्लभनगर, चिपळून, रोहा, जत, शिराळा, बुलढाणा, भोकर, तासगाव, बार्शी, करमाळा, अमरावती, कल्याण, ठाणे, रायगड, उमरगा, हैद्राबाद, लातूर, बीड, विजयपूर, कलबुर्गी यासह शेकडो बसेस विविध मार्गावर धावतात व मुक्कामी अक्कलकोट येथे येतात. अक्कलकोट शहरापासून रेल्वे स्थानक दुर असल्याने अनेक प्रवाशांची एसटीनेच अधिक प्रवास अक्कलकोटला येण्यासाठी होतो. यात्री प्रवाशांची या मोठ्या प्रमाणार बसस्थानकार वावर असल्याने सदर बसस्थानक बीओटी तत्वावर तात्काळ विकसित करणे अत्यंत गरजेचे बनले आहे.
अक्कलकोट बसस्थानकात मुलभूत सुविधांचा वणवा आहे. यामध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छता, सांडपाणी, धुळीचे अधिकप्रमाण, परिसरात डुकरांचा वावर, घाणीचे साम्राज्य, कचरा, बसस्थानकातील खड्डे यात भर म्हणजे अवैध प्रवाशी वाहतुक बसस्थानकाच्या प्रवेश व्दारावरच ठाण मांडून प्रवाशी उचलतात. ऑटोरिक्शा हे ही बसस्थानकाच्या प्रवेश व्दारावरच प्रवाशी उचलतात. यामुळे बसस्थानकातून बस बाहेर काढणे अत्यंत जिकरीचे बनल आहे.
बसस्थानकापासून शंभर मिटर अंतरावर अवैध प्रवाशी वाहतुक, भरणे-उचलणे प्रतिबंध आहे. तसेच बसस्थानक परिसरात ‘नो हॉकर्स झोन’ आहे. ना आरटीओ कडून ना स्थानिक पोलिसांकडून शंभर मीटर अंतरा अवैध वाहतुकीस प्रवेश बंदीचे अंमलबजावणी होत नाही. ना नगरपलिकेकडून ‘नो हॉकर्स झोन’ची अंमलबजावणी केली जात नाही. या सर्व दुरावस्थेमुळे प्रशासकीय यंत्रणेबाबत भक्तांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

चौकट
गुजरात राज्यातील पाटळी बसस्थानकाची अवस्था तीर्थक्षेत्र अक्कलकोटच्या बसस्थानकाची होवू नये
सध्या गुजरात राज्यातील विधानसभा निवडणुका होत आहे. या निवडणुकीच्या धमाधुमीत लोकांचा रोष टाळण्यासाठी सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पाटळी या तालुक्याच्या ठिकाणी चक्क तहसिल कार्यालयालाच बसस्थानक बनविण्यात आले आहे. गेल्या 2017 च्या विधानसभा निवडणुकीत बसस्थानकाचा मुद्दा त्या मतदारसंघात चर्चेत आला. त्यावेळी राजकीय पक्षाने आश्वासन दिले होते. म्हणून नागरिकांचा रोष लक्षात घेता व निवडणुकीत त्यांचे नुकसान होवून नये यासाठी चक्क निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच तहसिल कार्यालयाच्या इमारतीला रंगरंगोटी करुन बसस्थानक बनविण्यात आले आहे. अशी वेळ तीर्थक्षेत्र अक्ककोट बसस्थानकावर येवू नये, अशी अपेक्षा स्वामीभक्त, स्थानिक व प्रवाशांतून व्यक्त केली जात आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button