गावगाथा

वटवृक्ष मंदिरातील नियोजनबद्ध दर्शन व्यवस्थेमुळे भाविकांची संख्या वाढत आहे – मा.न्यायमुर्ती देबडवार

.न्यायमुर्ती देबडवार दाम्पत्यांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.

वटवृक्ष मंदिरातील नियोजनबद्ध दर्शन व्यवस्थेमुळे भाविकांची संख्या वाढत आहे – मा.न्यायमुर्ती देबडवार

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.२४/१२/२३) – येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थांचे देश विदेशासह राज्यभरात अनेक स्वामी भक्त आहेत. वटवृक्ष मंदिरातील भौतिक सौंदर्य येणाऱ्या भाविकांचे मन मोहून घेत आहे. नुकतेच आज नाताळ व शासकीय सुट्टयांच्या काळातील भक्तांच्या गर्दीमध्ये आम्हाला स्वामींचे दर्शन घेण्याकामी मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी आमच्या मंदिरातील आगमनाची दखल घेऊन तात्काळ स्वामी दर्शनाची उत्तम व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्या गर्दीतही महेश इंगळे साहेबांच्या कृपेमुळे लवकरात लवकर स्वामी दर्शनाचा दुर्मिळ योग लाभला. त्यामुळे मन प्रसन्न झालेले आहे. केवळ आमच्यासाठीच नाही तर येथे येणाऱ्या सर्वसामान्य भाविकांसह अबालवृद्धांसाठी महेश इंगळे हे नियमीतपणे स्वतः वटवृक्षाखाली उभे राहून सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुरळीत व सुलभतेने कसे होईल याकडे जातीने लक्ष देतात. स्वामी दर्शनाकामी कुठल्याही भाविकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जाण्याचा प्रसंग आल्यास त्यांना तातत्काळ मदतीचा हात देतात. हे आज आमच्या निदर्शनास आले आहे. या निमित्तानेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरातील नियोजनबद्ध दर्शन व्यवस्थेमुळे स्वामी भक्तांची संख्या वाढत असल्याचे मनोगत
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे निवृत्त न्यायमूर्ती तथा औरंगाबाद विद्यापीठाचे न्यायाधिकरण बी.यु.देबडवार यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास सपत्निक भेट देवून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी देबडवार दाम्पत्याचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी देबडवार बोलत होते. यावेळी मंदीर समितीचे सेक्रेटरी आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, स्वप्निल मोरे, श्रीशैल गवंडी इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – मा.न्यायमुर्ती देबडवार दाम्पत्यांचा वटवृक्ष मंदीरात सत्कार करताना महेश इंगळे दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button