*सचिन बेंडभर यांच्या अध्यक्षतेखाली रंगणार बाल कविसंमेलन*
काव्यप्रेमी शिक्षक मंच व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांचे आयोजन

*सचिन बेंडभर यांच्या अध्यक्षतेखाली रंगणार बाल कविसंमेलन*

– काव्यप्रेमी शिक्षक मंच व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांचे आयोजन
पुणे प्रतिनिधी
येथील काव्यप्रेमी शिक्षक मंच व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सुप्रसिद्ध युवा साहित्यिक व पाठ्यपुस्तकातील कवी सचिन बेंडभर यांच्या अध्यक्षतेखाली श्री क्षेत्र रांजणगाव येथे येत्या शनिवारी 17 तारखेला बालकवी संमेलन आयोजित करण्यात आले असून दुपारी बारा ते एकच्या दरम्यान तब्बल 30 बालकवी या संमेलनात सहभागी होणार असल्याची माहिती अध्यक्ष आनंद घोडके व काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे मुख्य संयोजक कवी संदीप वाघोले यांनी दिली.
पंधरावे राज्यस्तरीय साहित्य संमेलन श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथे येत्या शनिवारी 17 तारखेला होणार असून काव्यप्रेमी शिक्षक मंच शिरूर व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय साहित्य संमेलन संपन्न होणार आहे. यावेळी पुणे जिल्ह्यातील युवा साहित्यिक सचिन बेंडभर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बालसाहित्य संमेलन होणार असून परिसरातील शाळातून एकूण 30 बालकवी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
सकाळी दहा वाजता ग्रंथदिंडीने सदर कार्यक्रमाला सुरुवात होणार असून दुपारी बारा ते एकच्या दरम्यान हे बालकवी संमेलन रंगणार आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सीमा भांदर्गे व श्रीमंत कोळी उपस्थित राहणार असून या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनीषा खामकर करणार असल्याची माहिती काव्यप्रेमी शिक्षक मंचाचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष रणजित पवार यांनी दिली.
