अन्नछत्र न्यासाच्या परिसरात भक्तीच्या महापुराला शिस्तीची जोड पाहायला मिळत आहे — दादासाहेब आनंदा सरगर
अक्कलकोट : (प्रतिनिधी)*
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र न्यासाच्या परिसरात भक्तीच्या महापुराला शिस्तीची जोड पाहायला मिळत असल्याचे मनोगत बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबई चे मानद सचिव दादासाहेब आनंदा सरगर यांनी व्यक्त केले.*
ते टिम समस्त पदाधिकारी बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्था मर्यादित मुंबईची निवडणूक नुकतीच संपन्न झाली. संस्थेचे पदाधिकारी मानद सचिव दादासाहेब सरगर, उपाध्यक्ष धनवंत चव्हाण, खजिनदार हरिष आंधळे, संचालक योगेश वाघमारे, महेश अनपट, सिताराम घेरडे, संदीप बुरले, प्रफुल्ल सुर्वे, भाऊसाहेब इंगळे, श्रीकांत पवार, संतोष शिंगाडे, धनेश सरक हे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. सदर संस्था बृहन्मुंबई पोलीस कर्मचारी पगारदार सहकारी पतसंस्थेची टर्नओहर ३४०० कोटी इतकी आहे. या संस्थेवर मानद सचिव दादासाहेब आनंदा सरगर यांचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. या सर्वांना श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जन्मेजयराजे भोसले यांनी अभिनंदन करून भावी कारकिर्दीस शुभेच्छा व्यक्त केल्या.
यावेळी न्यासाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, अभियंता अमित थोरात, निखील पाटील, अतिश पवार, प्रवीण घाडगे, गोटू माने, सतीश महिंद्रकर, शहाजी यादव, स्वामिनाथ बाबर, बाळासाहेब घाडगे, नामा भोसले, संभाजीराव पवार, श्रीनिवास गवंडी, दत्ता माने, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, बसवराज क्यार, अनिल बिराजदार, चंद्रकांत हिबारे, एस के स्वामी, सिद्धाराम कल्याणी, शावरेप्पा माणकोजी, मल्लिनाथ कोगनुरे, महादेव अनगले, अनिल गवळी, कल्याण देशमुख, धनंजय निंबाळकर, विशाल घाडगे, रोहित कदम, विठ्ठल रेड्डी, समर्थ चव्हाण यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!