स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर

भविष्यात भक्ती, सेवा, सहकाराचा वारसा चालविण्याकरिता प्रथमेश इंगळेंचे व्यक्तिमत्व सक्षम – नितीन जाधव

पोलीस उपअधीक्षक नितीन जाधव व कुटुंबीयांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना प्रथमेश इंगळे दिसत आहेत.

भविष्यात भक्ती, सेवा, सहकाराचा वारसा चालविण्याकरिता प्रथमेश इंगळेंचे व्यक्तिमत्व सक्षम – नितीन जाधव

HTML img Tag Simply Easy Learning    

(प्रतिनिधी अक्कलकोट, दि.१७/६/२३)
येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे चिरंजीव प्रथमेश हे उमलत्या वयातच नेतृत्वाची कास धरत आहेत. त्यामुळे भविष्यात मंदीर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांच्याप्रमाणे प्रथमेश इंगळे हेही भक्ती सेवा सहकाराचा वारसा चालविण्याकरिता सक्षम असल्याचे प्रतिपादन नाशिक येथील सहाय्यक पोलीस उप अधीक्षक नितीन जाधव यांनी केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास सहकुटूंब
भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे चिरंजीव प्रथमेश इंगळे यांनी नितीन जाधव व कुटुंबियांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन सन्मान केला. याप्रसंगी बोलताना नितीन जाधव यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, प्रसाद सोनार, गिरीश पवार, संजय पवार, विपुल जाधव, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ इत्यादी उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

फोटो ओळ – पोलीस उपअधीक्षक नितीन जाधव व कुटुंबीयांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना प्रथमेश इंगळे दिसत आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button