गावगाथा

श्री क्षेत्र भोगलिंगेश्वर मठ मुगळी येथे १३ एप्रिल रोजी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह

नोंदणीसाठी संस्थानाचे मठाधिपती श्री भोगेश्वर स्वामीजी यांच्याशी संपर्क साधावा अथवा ७७०९६३८४६३/ ९९०१२३३७५५ या मोबाईल क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आला आहे.

श्री क्षेत्र भोगलिंगेश्वर मठ मुगळी येथे १३ एप्रिल रोजी मोफत सर्वधर्मीय सामुदायिक विवाह
अक्कलकोट दि ८ फेब्रुवारी
तालुक्यातील मुगळी येथील श्री क्षेत्र भोगलिंगेश्वर सुरगी संस्थान मठ वार्षिक यात्रा महोत्सानिमित्त शनिवार दि.१३ एप्रिल २०२४ रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री भोगलिंगेश्वर सुरगी मठ संस्थानाचे मठाधिपती श्री भोगेश्वर महास्वामीजी यांनी दिली आहे.
संस्थानाचे मठाधिपती श्री भोगेश्वर महास्वामीजी यांच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील लोकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य गेल्या २५ वर्षापासून निरंतर सुरु आहे. गेल्या २५ वर्षात सुमारे ८५० जोडपी या विवाह सोहळ्यामध्ये विवाहबद्ध झाली आहे. आजच्या महागाईच्या काळात सर्वसामान्यांना लग्नाचा खर्च व नियोजन करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. समाज ऋण व विवाह वेळी येणाऱ्या अडचणी या सर्व गोष्टींचा विचार करून संस्थानाचे मठाधिपती श्री भोगेश्वर स्वामीजी यांनी यंदा २६ वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केल्या आहेत. या विवाह सोहळ्यात नोंदणी केलेल्या वधू-वरास मोफत विवाहाचे कपडे, वऱ्हाडी मंडळीच्या भोजनाची सोय, स्वतंत्र मेकअप करण्याची व्यवस्था, वधूस मणी मंगळसूत्र व जोडवे देण्यात येतात.
तरी या विवाह सोहळ्यामध्ये जास्तीत जास्त विवाह इच्छुकांनी नोंदणी करावी असे आवाहन संस्थानाचे मठाधिपती श्री भोगेश्वर स्वामीजी यांनी केले आहेत. विवाह नाव नोदणी अंतिम दिनांक १२ एप्रिल २०२४ पर्यंत असेल. नाव नोंदणीसाठी संस्थानाचे मठाधिपती श्री भोगेश्वर स्वामीजी यांच्याशी संपर्क साधावा अथवा ७७०९६३८४६३/ ९९०१२३३७५५ या मोबाईल क्रमांक वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button