अन्नछत्र मंडळा कडून भक्तांनासाठी सुरू असलेल्या स्वामी कार्या बरोबरच विविधांगी विकासकामे ही उल्लेखनीय असून, येथे सकारात्मकता पहायला मिळत :उत्तर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे
अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला,

अन्नछत्र मंडळा कडून भक्तांनासाठी सुरू असलेल्या स्वामी कार्या बरोबरच विविधांगी विकासकामे ही उल्लेखनीय असून, येथे सकारात्मकता पहायला मिळत :उत्तर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे

*🔶अक्कलकोट :* (प्रतिनिधी)
*श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली भक्तांनासाठी सुरू असलेल्या स्वामी कार्या बरोबरच विविधांगी विकासकामे ही उल्लेखनीय असून, येथे सकारात्मकता पहायला मिळत असल्याचे मनोगत उत्तर पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांनी व्यक्त केले.*

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. त्यांच्या समवेत उत्तर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बागाव, पो.ना.चिदानंद उपाध्याय, केदार सुतार, आनंदराव कुंभार हे उपस्थित हेते.

याप्रसंगी न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे, मनोज निकम, पुरोहित विश्वंभर पुजारी, निखिल पाटील, वैभव नवले, पिंटू दोडमनी, सर्फराज शेख, अतिष पवार, राहुल डिंगगे एस.के.स्वामी, बाळासाहेब पोळ, सौरभ मोरे, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, बाळासाहेब घाडगे, गोटु माने, दत्ता माने, शावरेप्पा माणकोजी, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.
