गावगाथा

*खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यावतीने बचतगटातील महिलांना महिलादिना निमित्ताने किराणा किट वाटून त्यांचा केला सन्मान.*

महिला दिनानिमित्त विशेष

*खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यावतीने बचतगटातील महिलांना महिलादिना निमित्ताने किराणा किट वाटून त्यांचा केला सन्मान.*

शनिवार दि.9/03/2024 रोजी,आकांक्षा हाॅल,बी.आर.नगर ठाणे जिल्हा,दिवा (पूर्व),येथील मंगल कार्यालयात *रमाकांत मढवी* (मा.उपमहापौर/शिवसेना,दिवा शहर, प्रमुख) यांच्या आग्रहाने आणि *सौ.दिपालीताई भगत (मा.नगर सेविका) तसेच उमेश अशोक भगत* (शिवसेना,दिवा पूर्व विभाग प्रमुख) यांच्या पुढाकारातुन महिला बचत गटांना डाॅ.श्रीकांत शिंदे (कल्याण लोकसभा,खासदार) यांच्या वतीने महिला दिना निमित्ताने ‘किराणा किट’ देऊन,महिलांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला समाज सेविका अर्चनाताई पाटील,ॲड.सुप्रिया भगत,रेश्माताई पाटील (विशेष कार्यकारी अधिकारी) प्रमुख पाहुण्या लाभल्या तर समाज सेविका अर्चनाताई पाटील यांनी उपस्थित महिलांना शासनाच्या योजनांची माहिती दिली तर निशाताई यादव यांनी बचतगटाचे महत्त्व महिलांना समजावून सांगितले.बाबासाहेब गेंगे यांनीहि ‘माई आणि गाई’ यांच्या वर प्रबोधनात्मक गीत गाईले.तर पौर्णिमाताई उघाडे यांनीहि मनोरंजनाच्या माध्यमातुन प्रबोधनात्मक एकपात्री नाटकाचा प्रयोग करून,सर्वांची मने जिंकली.नगर सेविका दिपालीताई भगत यांनीहि आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले की,महिलांनी बचतगटाच्या माध्यमातुन आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे. पुढे दिपालीताई म्हणाल्या की,शिवसेना हि नेहमीची दिव्यातील नागरीक समस्या सोडविण्यास कार्यशिल राहिली आहे आणि या पुढेहि राहणार. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखाताई इंदुलकर (शिवसेना,दिवा पूर्व महिला शाखा संघटिका) यांनी केले.तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन रोकडे(शिवसेना,दिवा पूर्व कार्यालय प्रमुख),नरेंद्र पाटील (शाखाप्रमुख),सागर पवार,राकेश चव्हाण, अवधूत पाटील, मनोहर मोरे,सुहास मिसाळ यांनी परिश्रम केले.तर सर्व उपस्थितांचे आभार सूर्यकांत कदम (शिवसेना,दिवा पूर्व उपविभाग प्रमुख) यांनी मानुन,कार्यक्रम संपन्न झाला असे नगर सेविका,दिपालीताई भगत आणि उमेश भगत यांच्या वतीने घोषित केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button