*महिलांनी आरोग्य जपणे गरजेचे डॉ.जयश्री अळळे*
स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था व स्वामी विवेकानंद मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला

*महिलांनी आरोग्य जपणे गरजेचे डॉ.जयश्री अळळे*

स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था व स्वामी विवेकानंद मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना डॉक्टर जयश्री अळळे मॅडम यांनी महिलांना सामाजिक,आर्थिक, राजकीय व शैक्षणिक उंची गाठायची असेल तर आपले आरोग्य उत्तम जपले पाहिजे असे मत व्यक्त केले.
उषा हंचाटे मॅडम यांनी 8 मार्च का साजरा करतात याबद्दल सविस्तर माहिती दिली. स्त्री म्हणजे जन्मदाती, संस्कृती, नाविन्याचा वसा, घराच घरपण, महान कार्य अशा या स्त्री शक्तीला मानाचा मुजरा. आज भारतातील स्त्री प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगतीपथावर आहे. स्त्री-पुरूष समानता ही समाजात आचरणात आणायला हवी. स्त्री सन्मानाची सुरुवात आपल्या घरापासुन करायला हवी. तरचं आपला भारत देश सुरक्षित, सक्षम आणि बलवान होईल असे सागितले.
रोहिणी जाधव मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवून स्वतंत्र स्वराज्य निर्माण करून देण्यासाठी केलेल्या संघर्षाचे दर्शन देणा-या राजमाता जिजाऊ, इंग्रजांशी संघर्ष करणारी राणी लक्ष्मीबाई, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत करणारे माता रमाई, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या कार्याची माहिती दिली. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे म्हणले जाते ही सिद्ध करणारी अनेक उदाहरणे आपल्या समाजात आहेत. कर्तृत्ववान व समाजात मोलाचे काम करणाऱ्या महिलांचे, गृहउद्योग चालविणाऱ्या महिलांचा स्वामी विवेकानंद पतसंस्था व मल्टीस्टेट कडून सत्कार करण्यात आला व त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिले त्याबद्दल आभार व्यक्त केले.
स्वामी विवेकानंद पतसंस्था व मल्टीस्टेट मागील 13 वर्षापासून अक्कलकोट, हन्नुर, किणी,मैंदर्गी, तडवळ व मादनहिप्परगा येथे चेअरमन सन्मा.आ.सचिनदादा कल्याणशेट्टी व सर्व संचालक यांच्या मार्गदर्शन,खातेदार व हितचिंतक याच्या सहकार्याने संस्थेची वाटचाल सुरू आहे अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.ज्योती शिंदे यांनी दिले. यावेळी उपस्थित सौ.पूनम इंगळे, शमा नडगिरे, नेहा करजगी, शिल्पा व शारदा करकी, नीता शहा, यास्मिन शेख, कु.साक्षी करजगी, शुभदा आळळे यांचे सत्कार करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतसंस्था व मल्टीस्टेट कर्मचारी अर्चना पोतदार, संगीता शेटे, माधवी पाटील, धनश्री स्वामी, साक्षी उकरंडे यांनी परिश्रम घेतले.
