गावगाथा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या ग्रामीण पुणे जिल्हाध्यक्षपदी ईकबाल शेख यांची निवड

निवड नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाच्या ग्रामीण पुणे जिल्हाध्यक्षपदी ईकबाल शेख यांची निवड
वालचंदनगर (ता. इंदापूर) :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाच्या ग्रामीण पुणे जिल्हाध्यक्षपदी ईकबाल शेख यांची निवड करण्यात आली आहे. त्यांना निवडीचे अधिकृत पत्र राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या निवडीबद्दल बोलताना ईकबाल शेख यांनी सांगितले की, “या पदाच्या माध्यमातून ग्रामीण पुणे जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजासह सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे. पक्ष संघटना मजबूत करून तळागाळातील लोकांपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ध्येयधोरणे पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील.”
ईकबाल शेख यांच्या निवडीचे वृत्त समजताच पुणे जिल्हा तसेच इंदापूर तालुक्यातील राजकीय, सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक विभाग अधिक सक्रिय व प्रभावीपणे कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
फोटो ओळ :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग ग्रामीण पुणे जिल्हाध्यक्षपदी ईकबाल शेख यांची निवड झाल्यानंतर राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा सत्कार करताना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button