गावगाथा

डॉ. अशोक यक्कलदेवी यांची पद्मशाली शिक्षण संस्थेच्या ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, सोलापूर येथे प्राचार्यपदी नियुक्ती

निवड नियुक्ती

डॉ. अशोक यक्कलदेवी यांची पद्मशाली शिक्षण संस्थेच्या ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय, सोलापूर येथे प्राचार्यपदी नियुक्ती

HTML img Tag Simply Easy Learning    

सोलापूर: पद्मशाली शिक्षण संस्थेच्या ए. आर. बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य म्हणून डॉ. अशोक यक्कलदेवी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समाजशास्त्राचे प्राध्यापक असलेले डॉ. यक्कलदेवी हे समाजातील विविध प्रश्नांची सूक्ष्म जाण असलेले अभ्यासक म्हणून ओळखले जातात. संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी त्यांना प्राचार्य पदासाठी नियुक्तीपत्र देऊन त्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास क्यातम, उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी, विश्वस्त विजयकुमार गुल्लापल्ली, श्रीधर चिट्याल, तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

HTML img Tag Simply Easy Learning    

डॉ. यक्कलदेवी यांनी समाजातील उपेक्षित घटकांप्रती कायम जिव्हाळा आणि संवेदनशीलता ठेवून काम केले आहे. त्यांची विद्यार्थ्यांविषयी असलेली आस्था आणि समाजातील कामगार-मजुरांच्या मुलांसाठी असलेली सहानुभूती विशेष लक्षवेधी ठरली आहे. प्राचार्य म्हणून त्यांची निवड महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी एक सकारात्मक पाऊल असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

HTML img Tag Simply Easy Learning    

डॉ. यक्कलदेवी यांच्या नेतृत्वात महाविद्यालयाच्या शैक्षणिक उन्नतीला नवा आयाम मिळेल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button