श्री श्रीशैल मल्लिकार्जुन की जय ” च्या जयघोषात ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन याञा महोत्सवाची सांगता मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास भव्य – दिव्य रथोत्सवाने झाली

*🔶अक्कलकोट :* दि. २३ –” *श्री श्रीशैल मल्लिकार्जुन की जय ” च्या जयघोषात ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन याञा महोत्सवाची सांगता मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास भव्य – दिव्य रथोत्सवाने झाली.*

ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन याञा महोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा असल्याने त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पाच दिवशीय याञेच्या मुख्य दिवशी मंगळवारी रथोत्सवात विरशैव लिंगायत समाजांबरोबर इतर सर्व जाती- धर्मातील नागरिक-महिला मोठ्याप्रमाणात सहभागी झाले होते.यामुळे याञेमध्ये सर्वधर्म समभावासह भारतीय संस्कृतीचे दर्शन घडले.
प्रारंभी पहाटे पाच वाजता देवस्थानात ” श्री ” ची महाअभिषेक व महापूजा माजी नगराध्यक्ष बसलिंगप्पा खेडगी व अन्य मान्यवरांच्या हस्ते आणि वेदमुर्ती बसवराज शास्ञी यांच्या विविध मंञोपचाराने करण्यात आले.त्यानंतर कळसारोहण करण्यात आले.सकाळी १० वाजता शहराच्या प्रमुख मार्गावरुन पालखीची सवाद्य मिरवणुक काढण्यात आले. सकाळपासून देवस्थान भाविकांना दर्शनासाठी व नैवेद्य दाखविण्यासाठी खुला ठेवण्यात आले होते.

दिवसभर श्री मल्लिकार्जुन मंगल कार्यालयात शहर व तालुक्यातील हजारो भाविकांना खिरीचे महाप्रसाद वाटप करण्यात आले.

दुपारी ठिक एक वाजता नंदीध्वजाचे मानकरी अमोल पाटील, सेवानिवृत्त प्राध्यापक विजयकुमार लिंबीतोटे, सुनिल नंदिकोले, नागराज रोडगे, स्वामीनाथ आडवितोटे यांच्या घरासमोर पाच ही मानाच्या नंदिध्वज काठ्यांची विधीवत पूजा करुन सवाद्य मिरवणुक मार्गस्थ झाले.नंदिध्वज घेणारे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी – भक्तगण हे पांढरा शुभ्र बाराबंदी पोशाख परिधान केल्यामुळे उपस्थित भाविकांचे लक्ष वेधून घेत होते.मिरवणुक मार्गावर सडासंनार्जन करून सप्तरंगी रांगोळी च्या पायघड्या घातले होते. बँन्जो, बँड पथक, ढोल ताशा व सनईचा मधुर आवाज, फटाक्याची आताषबाजी व श्री च्या जयजयकाराने सारे अक्कलकोट शहर व परिसर दुमदुमून गेले होते. विशेष म्हणजे हुबळी येथील कलाकारांनी ठिकठिकाणी मनमोहक नृत्याचा खेळ सादर करुन उपस्थितांची मने जिंकून घेतले.
दर्शन व यात्रेचा आनंद लुटण्यासाठी शहर परिसरातून लहान मुलांसह भाविकांनी विशेषतः महिला भाविकांनी गर्दी केली होती. दुपारपासूनच देवस्थान मार्गावरील सर्व रस्ते भाविकांच्या अलोट गर्दीने फुलून गेले होते.

नंदिध्वजानां विविध रंगाच्या पताकासह नागफणी ने सुशोभित करण्यात आले होते.
मिरवणुक मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी नंदिध्वजाचे स्वागत पंचरत्न आरती ओवाळून करीत होते. नंदिध्वजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. हे पाचही नंदिध्वज देवस्थानला पाच प्रदक्षिणा घातल्या नंतर रथोत्सवास प्रारंभ करण्यात आले.

टोलेजंग रथोत्सवाला विविध रंगाच्या फुलांसह पुष्पहारनी सुशोभित करण्यात आले होते. रात्री ठिक आठ वाजता मोठ्या जयजयकाराने सर्व भाविकांनी रथ ओढण्यास सुरुवात केले. या रथावर प्रसाद’, खारीक, चुरमुरे, फळांचा वर्षाव केले.देवस्थान परिसरात भाविकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आले होते. सुमारे २५ हजार भाविकांच्या साक्षीने हा नेत्रदीपक मंगलमय सोहळा पार पडला.
याञेत विद्याधर गुरव, लक्ष्मण समाणे, अभिजित लोके यांनी सूञसंचालन केले.
या सोहळ्यास श्री बसवलिंग महास्वामीजी, महायुतीचे उमेदवार राम सातपुते,आमदार सचिन कल्याणशेट्टी, माजी आमदार सिध्दाराम म्हेञे, महेश इंगळे,मल्लिकार्जुन पाटील, दिलीप सिध्दे, बसलिंगप्पा खेडगी, मिलन कल्याणशेट्टी, अमोलराजे भोसले, अडव्होकेट अनिल मंगरुळे, मल्लिनाथ साखरे, महेश हिंडोळे, विशाल राठोड, वकिल बागवान,
बसवराज अळ्ळोळी, रामचंद्र समाणे, प्रमोद पाटील, देवस्थानचे अध्यक्ष शिवनिंगय्या स्वामी, प्रकाश उण्णद, बसवराज माशाळे, स्वामीनाथ हिप्परगी, प्रशांत लोकापूरे, सुनिल गोरे, दत्तकुमार साखरे, राजशेखर उंबराणीकर,एस. एस. बिराजदार, गुलाब भिमपूरे, शिवराज स्वामी, राजेंद्र नागुरे, विरुपाक्ष कुंभार सह अनेक हजारो भाविक उपस्थित होते.
विशेषतः उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे व अधिकारी – कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवले होते.
चौकट :
सर्वधर्म समभाव प्रमाणे विविध जाती – धर्मातील भाविक सहभागी झाल्याने याञा शिस्तबद्ध व शांततामय वातावरणात पार पडला.
यंदाच्या वर्षी याञा उत्सवाला भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. महिलांचा सहभाग सुध्दा लक्षणीय होती.
रथोत्सव प्रसंगी उंच आकाशात दारुगोळ्याची मोठ्या प्रमाणात आताषबाजी करण्यात आली. यामुळे सारे वातावरण मंगलमय झाले होते. मिरवणुक मार्गावर विविध सामाजिक संघटना व भाविकांच्या वतीने प्रसाद, शरबत, पाणी व दूध वाटप करण्यात आले.
फोठो ओळ –
अक्कलकोट – येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन याञा महोत्सवाची सांगता मंगळवारी रात्री भव्य – दिव्य रथोत्सवाने झाली.