ठळक बातम्यागावगाथा

पुणे हून दिल्लीकडे उड्डाण भरणाऱ्या एअर इंडिया विमानाचा पुणे विमानतळावर अपघात ; सर्व प्रवासी सुखरूप

पुणे (प्रतिनिधी):  पुणे हून दिल्लीकडे उड्डाण भरणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा पुणे विमानतळावर अपघात झाला. टग ट्रॅक्टरची आणि विमानाची धडक बसून हा अपघात झाला. यामध्ये विमानाचे नुकसान झाले असून प्रवासी व विमानातील कर्मचारी सुखरूप आहेत. ही घटना गुरुवारी (दि. 16) घडली.

HTML img Tag Simply Easy Learning    

एअर इंडियाचे विमान एआय 857 दिल्ली हुन पुणे विमानतळावर आले. 40 मिनिटांच्या विश्रांतीनंतर हे विमान एआय 858 सायंकाळी चार वाजता पुणे येथून दिल्लीकडे उड्डाण भरण्याच्या तयारीत होते. त्यावेळी विमानतळावर विमानाची आणि टग ट्रॅक्टरची धडक झाली. विमानतळावर टग ट्रॅक्टर सामानाची वाहतूक करणे तसेच विमानाला रनवे पर्यंत वळवून नेण्याचे काम करतात. या टग ट्रॅक्टरची विमानाला धडक बसल्याने विमानाचे नुकसान झाले.

HTML img Tag Simply Easy Learning    

या अपघातात विमानाचा पुढील भाग, लँडिंग गियर आणि एका टायरचे नुकसान झाले आहे. यावेळी विमानात 180 प्रवासी आणि विमानातील कर्मचारी होते. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुखरूप असल्याचे विमानतळ प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button