ठळक बातम्यागावगाथा
PCMC : पिंपरी-चिंचवड शहरात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा

निगडी (प्रतिनिधी) दि. १७, गेल्या तीन दिवसांपासून पिंपरी चिंचवड परिसरात मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे.

आजदेखील संध्याकाळी पाच वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे शहरवासीयांना आनंद मिळत असला तरी शेत मालावर याचा मोठा फटाका बसत आहे. आंबे, केळीचे बाग, अशा अनेक पिकांची नासाडी झाली आहे.


दरम्यान , शहरात आज झालेल्या पावसामुळे रस्त्यावर ठिक ठिकाणी पाणी तुंबलेले चित्र पाहायला मिळाले तसेच काही ठिकाणी आनंदाने पावसात भिजणारे चिमुकले, पावसामुळे साहाराविना त्रस्त झालेले दुचाकीस्वार आणि अचानक आलेल्या पावसामुळे पायी चालत जाण्याऱ्यांची उडालेली धांदल असा एकूण चित्र पाहायला मिळाला.
