ठळक बातम्यागावगाथा

Raj Thakare : पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर राज ठाकरेंनी केल्या ७ मागण्या ; कोणत्या आहेत त्या मागण्या ..? एकदा वाचाच…!

मुंबई (प्रतिनिधी) : नरेंद्र मोदी तब्बल 21 वर्षांनी मुंबईच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर सभेला आले. याबाबतचा उल्लेख राज ठाकरे यांनी केला. यावेळी राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांचं आणि केलेल्या कामांचं कौतुक केलं. पण तरीही राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे सात मागण्या केल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाची आणि पहिली मागणी ही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावी, अशी आहे.

 

राज ठाकरे यांनी मोदींकडे काय-काय मागण्या केल्या?

 

  • “पहिली अपेक्षा… मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. खितपत पडलेला. तुम्ही पंतप्रधान झाल्यावर तो सन्मान मिळेल ही अपेक्षा करतो”, असं राज ठाकरे म्हणाले.
  • “दुसरी अपेक्षा… देशाच्या अभ्यासक्रमात… देशात मराठा साम्राज्य होतं… त्या मराठा साम्राज्याचा इतिहास मुलांना शालेय शिक्षणात द्यावा. देश कसा उभा राहिला हे कळेल”, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी आपली दुसरी मागणी मोदींसमोर मांडली.
  • “तिसरी गोष्ट… समुद्रात शिवाजी महाराजांचा पुतळा कधी उभा राहील माहीत नाही. शिवाजींचे गडकिल्ले ही खरी स्मारक आहे. या गडकिल्ल्यांना ऐतिहासिक दर्जा प्राप्त करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी. पिढ्यांना इतिहास कळावा यासाठी ही समिती असावी”, अशी मागणी राज ठाकरे यानी केली.
  • “चौथी गोष्ट…. देशभरात अनेक ठिकाणी आपण रस्ते उत्तम बनवले, ब्रीज बनवले. १८ आणि १९ला वर्ष मुंबई-गोवा महामार्ग अजूनही खड्ड्यात आहे. तो लवकरात लवकर व्हावा ही विनंती आहे”, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.
  • “पाचवी गोष्ट…. तुम्ही तुमच्या सभेत सांगितलं… आज खडसावून सांगा… बाबासाहेबांच्या संविधानाला धक्का लागणार नाही हे सांगा. तुम्ही लावणार नव्हता. विरोधक जो प्रचार करत आहेत, त्यांची तोंड बंद व्हावीत”, असं राज ठाकरे म्हणाले.
  • “सहावी गोष्ट…. या देशात देशभक्त मुसलमान आहे. त्यांची देशावर निष्ठा आहेत. काही मूठभर आहेत. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसला पाठिंबा देणाऱ्यांचा उद्देश त्यांना १० वर्षात डोकंवर काढता आलं नाही. डोकंवर काढण्यासाठी काँग्रेससारखा सुलभ मार्ग नाही. मुस्लिम तुमच्यासोबत आहे. त्यांना तुमच्याबद्दल आदर आहे. त्यांना काम करायचे आहे. जे मूठभर आहेत. ओवैसी सारख्या औलादी आहेत. ज्यांचे जे अड्डे आहेत. ते अड्डे एकदा तपासून घ्या. तिथे माणसं घुसवा. तिथे देशाचे सैन्य घुसवा. म्हणजे आमच्या आया बहिणींना त्रास होणार नाही”, असं राज ठाकरे मोदींसमोर म्हणाले.
  • “सातवी गोष्ट…. रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे यंत्रणेंवर बारीक लक्ष द्या. अधिक निधी द्या”, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button