समाजोपयोगी कार्य केल्यास,जनता आपल्या पाठीशी राहील प्रा शिवाजी सावंत
समाजोपयोगी कार्य केल्यास,जनता आपल्या पाठीशी राहील प्रा शिवाजी सावंत

समाजोपयोगी कार्य केल्यास,जनता आपल्या पाठीशी राहील प्रा शिवाजी सावंत


अक्कलकोट दि. २९ समाजोपयोगी काम केल्यास जनता आपल्या पाठीशी उभे राहिल असे प्रतिपादन शिवसेना संपर्क प्रमुख प्रा शिवाजी सावंत म्हणाले. गुरुवारी कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे यांचा नातू गणेश निंगदाळे यांच्या वाढदिवसानिमित्त लोकापुरे फंक्शन हाॅल येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी बोलताना शिवाजी सावंत म्हणाले आपण जनतेची कामे वेळवर केले तर जनता आपल्या पाठीशी उभे राहिल कामगार सेना तालुकाप्रमुख स्वामीनाथ हेगडे यानी नातुच्या वाढदिवसानिमित्त बावीस विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व पंच्याहत्तर गरजु महिलाना साडी वाटप व विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेल्या रणरागीणींचा सन्मान करुन कौटुंबिक कार्यक्रमा निमित्त सामाजिक कार्य करुन जनतेचे आशिर्वाद मिळवला हे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे असे प्रा शिवाजी सावंत म्हणाले यावेळी मंचावर शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल बापु शिंदे


तालुकाप्रमुख संजय देशमुख जिल्हा महिला आघाडीप्रमुख रविनाताई राठोड भाजपा चे जेष्ठ नेते मल्लिनाथ स्वामी शिवसेना विधानसभा संघटक प्रा.सुर्यकांत कडबगावकर महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ.वर्षाताई चव्हाण शहरप्रमुख वैशाली हावनूर उपस्थित होते प्रथम हेगडे व निंगदळे परीवारा तर्फे मान्यवरांचे सत्कार करण्यात आले .मान्यवरांच्या हस्ते बावीस गुणवंत विध्यार्थ्याचा सत्कार व पंच्याहत्तर महिलाना साडी वाटप करण्यात आले त्यानंतर सावंत साहेब यांच्या उपस्थितीत चिं गणेश निंगदेळेचा वाढदिवस साजरा करण्यात आले व गणेश याला मान्यवरांसह अनेकानी शुभाशीर्वाद दिले यावेळी स्वामीनाथ हेगडे व सोमेश्वर निंगदळे दांपत्याचा सत्कार संपर्क प्रमुख प्रा शिवाजी सावंत यांच्या हस्ते करण्यात आले .जिल्हाप्रमुख प्रमुख अमोल बापु शिंदे व तालुकाप्रमुख संजय देशमुख यानी मनोगत व्यक्त करुन बाळास शुभेच्छा दिले या वेळी तालुकाउप्रमुख उमेश पांढरे सिध्दाराम हत्तुरे चंद्रकांत वेदपाठक परशुराम जाधव लक्ष्मण पुजारी जयश्री कोलाटी अनीता घोडके इंदुमती वाघमारे अश्विनी पाटील वर्षा म्हैत्रे ताराबाई कुभांर लता गायकवाड भिमव्वा सावळे व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सूत्रसंचालन प्रा.सुर्यकांत कडबगावकर यानी केले आभार सोमेश्वर निंगदळे यानी मानले
