ठळक बातम्या

पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुणे शहरातही या भागात गुरूवारी राहणार पाणीपुरवठा बंद

पुणे (प्रतिनिधी): वडगांव जलकेंद्र व राजीव गांधी पंपिंग येथील दुरुस्ती व देखभालीची कामे असल्याने तसेच धनकवडी येथील शिवशंकर चौक येथे कलवर्टचे काम सुरु असल्याने येत्या गुरुवारी वडगाव, धायरी, आंबेगावपठार, सुखसागरनगर परिसरातील पाणी पुरवठा येत्या गुरुवारी (दि.30) बंद असणार आहे.

विद्युत / पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे  देखभाल दुरुस्ती व अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे कामांसाठी तसेच आहे. सदर कामामध्ये अडथळा ठरणारी 796 मीमी व्यासाची पाईप लाईन शिफ्ट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे उपरोक्त ठिकाणची पंपींग यंत्रणा बंद ठेवावी लागणार असल्याने उपरोक्त पंपींगचे अखत्यारीतील पूर्ण दिवसाचा पाणीपुरवठा सदर दिवशी बंद राहणार आहे.

पाणी पुरवठा बंद असणारा भाग-
वडगाव जलकेंद्र परीसर – हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ वरील भाग, आंबेडकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर, इत्यादी.
राजीव गांधी पंपिंग :- सच्चाई माता टाकी, संतोष नगर, दत्तनगर, आंबेगाव बुद्रुक, आंबेगाव खुर्द, सुंदा माता नगर, वंडर सिटी, मोरेबाग, श्रीहरी टाकी, बालाजी नगर, पवार हॉस्पिटल परिसर, केदारेश्वर टाकी, सुखसागर नगर मधील भाग क्रमांक एक व दोन, राजेश सोसायटी, उत्कर्ष सोसायटी, सुंदरबन सोसायटी, शेलार मळा, कात्रज गावठाण, भारत नगर, दत्तनगर, जुना प्रभाग 38 मधील वरखडे नगर तसेच संपूर्ण जुना प्रभाग 41 व येवलेवाडी परिसर इ.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button