ठळक बातम्या

गावगाथा : देश-विदेशातील महत्वाच्या ठळक बातम्या एका क्लिकवर

🌅 २८ मे २०२४ 

HTML img Tag Simply Easy Learning    
  • 👉 शालेय शिक्षण अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्यास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तीव्र विरोध केला आहे.
  • 👉 याविरोधानंतर शालेय अभ्यासक्रमात आता मनुस्मृतीचे श्लोक घेतले जाणार नसल्याचे आश्वासन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना दिले आहे.
  • 👉 लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच राजकीय पक्षांनी विधानसभेची तयारी सुरु केली. महाराष्ट्रात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.
  • 👉 याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मोठे वक्तव्य केले आहे. भाजपने विधानसभेमध्ये 80 ते 90 जागा राष्ट्रवादीला देण्याचा शब्द दिला आहे, असा दावा भुजबळांनी केला आहे.
  • 👉 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या पक्षाच्या तब्बल ७८ खासदारांनी पराभवाच्या भीतीने राजीनामे दिले आहेत. वेळेपूर्वीच निवडणुका जाहीर केल्याने,👉 पक्षामध्ये नाराजी असल्याने ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाच्या ७८ खासदारांनी राजीनामा दिल्याने ब्रिटनमध्ये खळबळ उडाली आहे.
  • 👉 उत्तराखंड सरकारने लिव्ह-इन संबंधांना औपचारिकपणे मान्यता देण्यासाठी आणि नियमन करण्यासाठी कायदेशीर चौकट तयार केली आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमधील लोकांसाठी स्पष्ट कायदेशीर मार्गदर्शक तत्त्वे आणि संरक्षण प्रदान करणे हा त्याचा उद्देश आहे.
  • 👉 समान नागरी कायद्यांतर्गत, उत्तराखंडमधील लिव्ह-इन रिलेशनशिपमधील लोकांना त्यांच्या स्थानिक रजिस्ट्रारकडे नातेसंबंधांचे तपशील सादर करणे अनिवार्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button