गावगाथाठळक बातम्या

रेल्वे मेगा ब्लॉकचा परिणाम थेट मुंबई -पुणे द्रुतगती महामार्गावर ; वाहनांच्या ९-१० किलोमीटर पर्यंत रांगा

HTML img Tag Simply Easy Learning    

 

HTML img Tag Simply Easy Learning    

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) : विकएंड आणि त्यात रेल्वे चा मेगब्लॉक याचा ताण मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आला असून आज (शनिवारी) पहाटेपासून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहनाच्या ९ ते १० किमी च्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

पुण्याकडे येणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतूक अतिशय संत गतीने सुरू असून अमृतांजन पूल ते खालापूर टोल नाका अशा साधारण आठ ते नऊ किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याच्या दिशेने जाणारी ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना खंडाळा बोगद्याजवळ थांबवत सर्व सहा लेन या पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांसाठी काही वेळेचा ब्लॉक घेत सोडण्यात येत आहेत. तसेच मुंबईच्या दिशेने जाणारी अवजड वाहने ही लोणावळा एक्झिट या ठिकाणी थांबवण्यात आली आहेत.

HTML img Tag Simply Easy Learning    

महाबळेश्वर, पाचगणी, लोणावळा यासह कोल्हापूर, नाशिक या भागांमध्ये पर्यटनासाठी जात आहेत. तसेच कोकण किनारपट्टीला जाणारे अनेक पर्यटक हे कराड व कोल्हापूर मार्गे जात असल्याने मुंबई पुणे एक्सप्रेस वे  वर वाहनांच्या संख्येमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे आज पहाटे पासुनच मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहतूक कोंडीमुळे झाली आहे

HTML img Tag Simply Easy Learning    

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button