*नागणसुर जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुले – मुली व सर्व कन्नड वस्ती शाळेत आषाढी एकादशी निमित्त बाल वारकरी ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी भक्तीयय वातावरणात संपन्न*
वारी पालखी सोहळा विशेष

*नागणसुर जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुले – मुली व सर्व कन्नड वस्ती शाळेत आषाढी एकादशी निमित्त बाल वारकरी ग्रंथदिंडी, वृक्षदिंडी भक्तीयय वातावरणात संपन्न*
*अक्कलकोट:-*
बोला पुंडलिक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, या जयघोषात जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड मुले – मुलींची शाळा नागणसूर व बंधु नगर, हिप्परगी वस्ती, नागलगांव वस्ती, इंदिरा नगर कन्नड शाळेतील विद्यार्थ्यांना विविध संतांच्या वेशभूषेत श्री विठ्ठल रुक्मिणी वेषात बाल गोपाळांची आषाढी एकादशीच्या निमित्ताने बाल वारकरी संप्रदाय पालखी, ग्रंथ दिंडी वृक्ष दिंडी उत्साहपूर्ण वातावरण संपन्न झाले.
प्रारंभी बाल वारकरी पालखी दिंडीचे पुजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, बसनिंगय्या स्थावरमठ, गंगाधर भासगी, ग्राम पंचायत सदस्य ओंकार गंगोंडा, शरणप्पा मणुरे, बसवराज तेग्गीनकेरी, पावाडय्या नंदीकोल, विजयकुमार पोतदार, तिप्पण्णा माड्याळ, सौ गुरुबाई प्रचंडे, केंद्रीय मुख्याध्यापक विद्याधर गुरव, मुलींची शाळेचे मुख्याध्यापक श्रीशैल दोडमनी यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आले.
सर्व बका वारकरी आनंदात विविध अभंग, टाळ, मृदंग, वीणा, चिपळ्या वाजवत, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल हरी ओंम विठ्ठल, विठ्ठल नामाची शाळा भरली, माऊली माऊली, म्हणत नागणसूर गावातील प्रमुख पालखी दिंडी मार्गावर प्रदक्षिणा घालून गोल रिंगण सोहळा पार पडले.
दिंडी यशस्वी करण्यासाठी कल्लय्या गाणाचारी ,शरणप्पा फुलारी, शिवशरण म्हेत्रे, खाजप्पा किणगी, बसवराज स्वामी , राजशेखर कुर्ले, लक्ष्मीकांत तळवार, शांताबाई तोळणुरे, विजयश्री एंटमन, चन्नम्मा बिरादार, अंगणवाडी सेविका, मदतनीस, बाल वारकरी संप्रदाय, बालचमु उपस्थित होते.
पालखी दिंडी नागणसूर गावातील प्रमुख मार्गावरून जात असताना ठिक ठिकाणी माता भगिनी यांनी दिंडीचे पाणी घालून पूजन करून औक्षण स्वागत करत होते. म्हणजे आपल्याला गर्दीत पंढरपूरचे वारी करता आला नाही, तरी प्रत्यक्षात पंढरीनाथ आमच्या घरी आले आहे. हे भावना प्रत्येकाचा मनात निर्माण झाले होते. गावातील नागरिक माता भगिनी यांनी या बाल वारकरी संप्रदाय पालखी सोहळा पाहून आनंदित होवून तल्लीन होऊन नाचत होते. शेवटी ग्राम पंचायत जवळ आल्यावर जिल्हा परिषद मराठी शाळेतील मुख्याध्यापक राजशेखर करपे, तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बसवराज खिलारी, शिक्षक विश्वनाथ देवरमनी, आणि विद्यार्थी पालखी दिंडीचे दर्शन घेऊन स्वतः वारकरी सोबत दिंडीत सहभागी झाले. भक्तीत रममाण होऊन नाचून फुगडी खेळले.
या वारीच्या सुव्यवस्थेचा काम सर्व नागणसूर येथील कन्नड मुलांची मुलींची शाळा, बंधू नगर, नागलगांव, हिप्परगी वस्ती, इंदिरा नगर कन्नड शाळा येथील सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्व सदस्य यांच्या अनमोल सहकार्य मिळाले आहे. शेवटी नागणसूर केंद्र शाळेचे वतीने मुख्याध्यापक विद्याधर गुरव सर यांनी सर्वांचे आभार मानले.
*फोटो ओळ:-*
बाल वारकरी पालखी दिंडीचे पुजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, बसनिंगय्या स्थावरमठ, गंगाधर भासगी, ग्राम पंचायत सदस्य ओंकार गंगोंडा, शरणप्पा मणुरे, बसवराज तेग्गीनकेरी, पावाडय्या नंदीकोल, विजयकुमार पोतदार, तिप्पण्णा माड्याळ, सौ गुरुबाई प्रचंडे, केंद्रीय मुख्याध्यापक विद्याधर गुरव, मुलींची शाळेचे मुख्याध्यापक श्रीशैल दोडमनी यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून शुभारंभ करण्यात आले.
