अहिल्याबाई होळकर जयंती वागदरीत साजरी
वागदरी (ता. अक्कलकोट) – येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सार्वजनिक वाचनालयात अहिल्याबाई होळकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन वाचनालयात करण्यात आले होते.
कार्यक्रमावेळी वाचनालयाचे अध्यक्ष श्रीकांत सोनकवडे, कर्मचारी सुरेश छुरे, कोटप्पा कोठे, तसेच वागदरीचे माजी सरपंच हुचप्पा अरूणे, विजयकुमार शिदे, सिद्धाराम सरसंबी, सुधीर सोनकवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला व त्यांच्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले. उपस्थित सर्व वाचक व सभासदांनी कार्यक्रमाचा मनःपूर्वक आनंद घेतला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Back to top button
×
No WhatsApp Number Found!